Pro Kabaddi 2024 (Match 103) | जयपूर पिंक पँथर्सचा गुजरातवर जबरदस्त विजय, प्लेऑफच्या आशा अजूनही कायम…

Pro Kabaddi League 2024 (Gujarat Giants vs Jaipur Pink Panthers) – प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 103 वा सामना गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात पुणे येथे पार पडला. या सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्सने गुजरात जायंट्सचा 42-29 असा पराभव केला.
पैंथर्स के जोश ने उड़ाए जायंट्स के होश 🤯
दर्ज की धमाकेदार जीत 🩷#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #JaipurPinkPanthers pic.twitter.com/No6xdxQSdt
— ProKabaddi (@ProKabaddi) December 10, 2024
या पराभवानंतर गुजरात जायंट्सच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत तर जयपूरने एकप्रकारे प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे. गुजरात संघाचे 18 सामन्यानंतर 34 गुण आहेत. ते गुणतालिकेत 10 व्या क्रमांकावर आहेत तर जयपूरचे 18 सामन्यानंतर 54 गुण असून ते गुणतालिकेत सहाव्या क्रमाकांवर आहेत.
जयपूर पिंक पँथर्ससाठी, त्यांच्या दोन्ही मुख्य रेडर्सनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अर्जुन देशवालने 13 तर नीरज नरवालने 8 गुण घेतले. डिफेंसमध्ये (बचाव) रेझा मिरबाघेरीने 4 गुण, अंकुशने 5 गुण आणि रौनकने 3 गुण घेतले.
Pro Kabaddi League 2024 (Match 101) | हरियाणा स्टीलर्सचा तेलुगु संघावर एकतर्फी विजय…
दुसरीकडे गुजरात जायंट्ससाठी रेडिंगमध्ये (छापा) राकेश आणि गुमान सिंग यांनी 9-9 गुण घेतले पण संघाला डिफेंसकडून (बचाव) साथ मिळाली नाही. डिफेंसमध्ये फक्त रोहितला 3 गुण मिळवता आले आणि त्यामुळे गुजरात जायंट्सला पराभवाला सामोरे जावे लागले.





