Pro Kabaddi 2024 (Bengaluru Bulls vs Jaipur PinkPanthers) : – प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात परदीप नरवालच्या बेंगळुरू बुल्सला आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. जयपूर पिंक पँथर्सने बेंगळुरू बुल्सचा 39-32 असा पराभव केला. अशा प्रकारे बुल्सला या मोसमात सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
पैंथर्स ने बुल्स को किया जख़्मी 🐾🔥
दर्ज की शानदार जीत 🩷#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #JaipurPinkPanthers pic.twitter.com/fUBIKKgXgO
— ProKabaddi (@ProKabaddi) November 12, 2024
पूर्वार्धात बंगळुरू संघाने 19-17 अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात जयपूर संघाने मुसंडी मारताना तब्बल 22 गुणांची कमाई करताना विजय साकारला. या हंगामात पिंक पँथर्सने चौथा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली. प्रदीप नरवाल दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नव्हता.
Pro Kabaddi 2024 : चुरशीच्या सामन्यात यू-मुम्बाविरूध्द हरियाणा स्टीलर्स विजयी…
जयपूर संघाकडून अर्जुन देशवालने 19 गुणांची कमाई करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसरीकडे बुल्स संघाकडून रेडर अजिंक्य पवार9 गुणांची कमाई केली. मात्र इतरांची हवी तशी साथ न मिळाल्याने बुल्सला पराभवाचा सामना करावा लागला.