Pro Kabaddi 2024 (U-Mumba vs Haryana Steelers) :- प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमात सोमवारी झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्स संघाने गुजरात जायंट्स संघाला तर हरियाणा स्टीलर्स संघाने यु मुम्बा संघाला पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पहिल्या लढतीमध्ये पाटणा पायरेट्स संघाने गुजरात जायंट्स संघाला 40-27 असे पराभूत केले.
धाकड़ छोरों ने जीता दिल 💙
कांटे की टक्कर मुक़ाबले में #UMumba को दी करारी शिकस्त 💪🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers pic.twitter.com/K05nVIrbPt
— ProKabaddi (@ProKabaddi) November 11, 2024
दुसऱ्या लढतीमध्ये हरियाणा स्टीलर्स संघाने यु मुम्बा संघाला 48-39 असे 9 गुणांनी पराभूत केले. पहिल्या सत्रात यु मुम्बा संघाने 23-22 अशी एका गुणांची आघाडी घेतली होती. दोन्ही संघांनी चढाईतून प्रत्येकी 15 गुणांची तर पकडीतून प्रत्येकी 4 गुणांची कमाई केली. दोन्ही संघांनी एकमेकांवर लोन चढविताना प्रत्येकी 2 गुण मिळविले.
दुसऱ्या सत्रात हरियाणा संघाने आपला खेळ उंचावला. दुसऱ्या सत्रात हरियाणा संघाने चढाईतून 11 तर पकडीतून 10 गुणांची तर लोन चढविताना 2 गुणांची कमाई केली. यु मुम्बा संघाने दुसऱ्या सत्रात चढाईतून 8 तर पकडीतून 7 गुणांची कमाई केली.
Pro Kabaddi 2024 : पाटणा पायरेट्सकडून गुजरात जायंट्सचा दारूण पराभव…
दोन्ही संघांनी लढतीत प्रत्येकी 42 चढाया केल्या, यापैकी हरियाणा संघाने 24 तर यु मुम्बा संघाने 15 गुणांची कमाई केली. हरियाणा स्टीलर्स संघाकडून विशाल ताटे व शिवम पातारे यांनी प्रत्येकी 11 गुण मिळविताना सुपर 10 पूर्ण केले. यु मुम्बाच्या अजित चौहानने तब्बल 18 गुण मिळविताना चांगली लढत दिली.