Pro Kabaddi 2024 : तेलगू टायटन्सची सरशी, बंगाल वॉरियर्सचा पराभव करत गुणतालिकेत घेतली मोठी झेप…

Pro Kabaddi 2024 (Bengal Warriorz vs Telugu Titans) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 67 व्या सामन्यात तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सचा 31-29 असा पराभव केला. या विजयासह तेलुगू टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पवन सेहरावतच्या अनुपस्थितीत विजय मलिकने पुन्हा एकदा संघासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने एकूण 14 गुण घेतले. या सामन्यासाठी बंगाल वॉरियर्सने आपल्या संघात चार बदल केले होते, तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही.
చూడప్ప సిద్దప్ప!! 😎
సింహం అడివికి రాజు 🦁
టైటన్స్ మ్యాట్ పై రాజులు 👑మరొక రోజు మరొక విజయం ✊🏻🥳#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #TeluguTitans pic.twitter.com/ckiiJHtyO2
— ProKabaddi (@ProKabaddi) November 21, 2024
कर्णधार फजल अत्राचली या सामन्यात एकही गुण मिळवू शकला नाही. सीझन 4 नंतर पहिल्यांदाच तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सचा पराभव केला आहे आणि यासह ते अनेक मोसमानंतर प्रथमच पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी पोहोचले आहेत. तेलुगू टायटन्सच्या चढाईत विजय मलिकने एकहाती गुण मिळवले. बंगाल वॉरियर्सचा बचाव त्याला अजिबात रोखू शकला नाही. विजय मलिकने 14 गुण मिळविताना, संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वॉरियर्स संघाकडून प्रणय राणेने 9 गुणांची कमाई करताना चांगली लढत दिली.
तेलगू टायटन्स संघाने पहिल्यापासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. मध्यंतराला टायटन्स संघाने 19-9 अशी तब्बल 10 गुणांची आघाडी घेतली. पहिल्या सत्रात19 पैकी 11 गुण टायटन्स संघाने चढाईतून मिळविले. त्याबरोबरीने टायटन्स संघाने वॉरियर्सवर लोन चढविताना 2 गुणाची कमाई देखील केली.
Pro Kabaddi 2024 : पवन सेहरावतशिवाय तेलुगु टायटन्सचा आणखी एक मोठा विजय, यू मुम्बा पराभूत…
पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या वॉरियर्स संघाने आपला खेळ उंचावला. त्यांनी दुसऱ्या सत्रात 20 गुणांची कमाई केली तर टायटन्सला केवळ 12 गुण मिळविता आले. वॉरियर्सने देखील चढाईतून 12गुणाची तर पकडीतून 5 गुणांची कमाई केली. लढतीत दोन्ही संघांनी 41 रेड्स केल्या, यापैकी वॉरियर्स संघाने 18 तर टायटन्स संघाने 16 यशस्वी रेड्स केल्या.





