Pro Kabaddi 2024 : पवन सेहरावतशिवाय तेलुगु टायटन्सचा आणखी एक मोठा विजय, यू मुम्बा पराभूत…

Pro Kabaddi 2024 (Telugu Titans Vs U-Mumba) :- प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात तेलुगू टायटन्सने यू मुम्बाचा 31-29 असा पराभव केला. पवन सेहरावत पुन्हा एकदा या सामन्यात खेळला नाही पण तरीही संघ जिंकला. टायटन्ससाठी आशिष नरवालने या सामन्यात सर्वाधिक 8 गुण घेतले. दुसरीकडे यू मुम्बाकडून मनजीतने सर्वाधिक 7 गुण घेतले.
టైటన్స్కు ఇవన్నీ చాలా మామూలు అండి 😎
వస్తారు గెలుస్తారు రిపీట్ అంతే!! 🥳#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TeluguTitans #UMumba pic.twitter.com/qMoBDH3i8H
— ProKabaddi (@ProKabaddi) November 20, 2024
तेलुगू टायटन्सने पवन सेहरावतशिवाय सलग दुसरा विजय मिळवत टॉप 6 मध्ये प्रवेश केला. तेलुगू टायटन्सचा संघ आता 37 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमाकांवर पोहचला आहे. यु-मुब्मा पराभवानंतरही 40 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमाकांवर कायम आहे.
Pro Kabaddi 2024 : दिल्ली-गुजरात लढत बरोबरीत, प्रतीक दहियाची चमकदार कामगिरी…
तत्पूर्वी, प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 65 वा सामना दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना 39-39 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात नवीन कुमारने दिल्लीसाठी पुनरागमन केले आणि त्याने 9 गुण घेतले आणि आशू मलिकने 11 गुण घेतले. तर गुजरात जायंट्ससाठी प्रतीक दहियाने जबरदस्त खेळ दाखवला आणि एकट्याने 20 गुण मिळवून संघाला पुढे नेले.





