Priyansh Arya : गंभीरचा ‘छोटा भाऊ’ IPL 2025 मध्ये घालतोय धुमाकूळ, प्रीती झिंटालाही केले चकित

Priyansh Arya Shines in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये गौतम गंभीरच्या भावाने धुमाकूळ घातला आहे. तो गौतम गंभीरप्रमाणेच शांत, मृदुभाषी, स्वभावाने लाजाळू आणि डावखुरा फलंदाज आहे. गंभीरने स्वतः त्याला मार्ग मार्गदर्शन केले आहे. दोघांमध्ये रक्ताचे नाते नसले तरीही. पण, गौतम गंभीरसाठी तो लहान भावापेक्षा कमी नाही. आम्ही प्रियांश आर्यबद्दल बोलत आहोत, ज्याने आयपीएल २०२५ मध्ये प्रीती झिंटालाही आपल्या बॅटच्या ताकदीने आश्चर्यचकित केले होते.
आयपीएल २०२५ मध्ये, प्रियांश प्रीती झिंटाच्या टीम पंजाब किंग्जचा भाग आहे. त्याचा पहिला आयपीएल हंगाम खेळत असताना, २४ वर्षीय प्रियांश आर्यने त्याच्या चौथ्या डावात असा धमाका केला की सगळेच थक्क झाले. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ४२ चेंडूत १०३ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. आयपीएल २०२५ च्या पहिल्या ४ सामन्यांमध्ये, प्रियांश आर्यने २१० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १५८ धावा केल्या आहेत. तो त्याच्या संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
Our energy in the stands, our strength off the field. 😍
Our co-owner, Preity G Zinta cheered for our Shers in the win over @ChennaiIPL . 😌 pic.twitter.com/T8VlZo5tBw
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 10, 2025
प्रीती झिंटानेही केले कौतुक –
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत दोन शतके झाली आहेत, त्यापैकी सर्वात वेगवान शतक प्रियांश आर्यने केले आहे. त्याच्या या खेळीने प्रभावित झालेल्या प्रीती झिंटाने त्याच्यासोबतच्या तिच्या दोन भेटींचा उल्लेख करत त्याच्यासाठी एक खास कौतुकाच पोस्ट शेअर केली आहे. पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाने प्रियांशसोबतचे तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, “काही दिवसांपूर्वी मी २४ वर्षीय प्रियांश आर्यला भेटले. तो खूपच शांत आणि लाजाळू दिसत होता. तो एक शब्दही बोलला नाही.”
View this post on Instagram
हेही वाचा – Ambati Rayudu : ‘कोणी काहीही बोलो…’, सिद्धूशी झालेल्या वादानंतर रायुडूची धोनीच्या समर्थनार्थ पोस्ट
प्रीती झिंटाने प्रियांशसोबतच्या दुसऱ्या भेटीबद्दल काय सांगितले?
यानंतर, प्रीती झिंटाने प्रियांशसोबतच्या तिच्या दुसऱ्या भेटीचा उल्लेख केला, जो पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचा दिवस होता. प्रीती झिंटा म्हणाली की, “त्या दिवशी त्याची प्रतिभा बोलत होती. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने त्या दिवशी फक्त मलाच नाही तर संपूर्ण भारताला आश्चर्यचकित केले.” प्रियांश आर्य हा उत्तर-पश्चिम दिल्लीतील अशोक नगर भागातील रहिवासी आहे. दिल्लीतील हे ते ठिकाण आहे जिथे मुले UPSC परीक्षा पास होऊन IAS-IPS होण्याचे स्वप्न पाहतात. पण प्रियांश आर्यने त्याच्यापेक्षा वेगळा मार्ग निवडला.
हेही वाचा – Ruturaj Gaikwad : थाला इज बॅक! CSK ने घेतला मोठा निर्णय; ऋतुराज ऐवजी धोनी सांभाळणार संघाची धुरा
प्रियांश आर्यचे वडील पवन आर्य, जे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी सांगितले की, गौतम गंभीरने प्रियांशला अंडर-१९ क्रिकेट सामन्यात २७१ धावा केल्यापासून खूप मदत केली आहे. त्याला नेहमीच गंभीरकडून पाठिंबा मिळाला आहे. गंभीरने प्रियांशला दिल्ली लीग आणि हॉट वेदर स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांच्या मुलाला खूप फायदा झाला.





