Ruturaj Gaikwad : थाला इज बॅक! CSK ने घेतला मोठा निर्णय; ऋतुराज ऐवजी धोनी सांभाळणार संघाची धुरा

MS Dhoni lead CSK in IPL 2025 because Ruturaj Gaikwad ruled out : आयपीएल २०२५ मध्ये सीएसकेचा संघ शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी सीएसकेला संघाला मोठा धक्का बसला. ज्यामुळे त्यांना सामन्याच्या एक दिवस आधी संघात हा मोठा बदल करावा लागला आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामातील उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी संघाची धुरा एमएस धोनी सांभाळणार आहे. याबाबत संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माहिती दिली आहे.
ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर –
सीएसके संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऋतुराज गायकवाडच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे तो यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे सीएसकेचे नेतृत्व एमएस धोनी करणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार ऋतुराजलाच्या कोपराला दुखापत झाली होती. मात्र, यानंतर तो पुढील २ सामने खेळला पण आता त्याच्या कोपरात फ्रॅक्चर आढळले आहे, ज्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
🚨 OFFICIAL STATEMENT 🚨
Ruturaj Gaikwad ruled out of the season due to a hairline fracture of the elbow.
MS DHONI TO LEAD. 🦁
GET WELL SOON, RUTU ! ✨ 💛#WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/U0NsVhKlny
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2025
याआधीही धोनीच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा सुरु होती, जेव्हा ५ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वीच गायकवाडच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ऋतुराज त्या सामन्यातून बाहेर पडेल असे मानले जात होते. अशा परिस्थितीत धोनीचे कर्णधार म्हणून पुनरागमन निश्चित मानले जात होते. पण गायकवाड तो सामना खेळला आणि त्यानंतर तो पंजाब किंग्जविरुद्धही मैदानात उतरला. पण या दोन्ही सामन्यांमध्ये तो फक्त ६ धावा करू शकला, यावरून स्पष्ट होते की तो कदाचित पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. कारण राजस्थानचा गोलंदाज तुषार देशपांडेचा चेंडू त्याला जोरात लागला होता. ज्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या होत्या.
Fleming has confirmed that Ruturaj Gaikwad is ruled out of IPL 2025 🥲🥲 pic.twitter.com/a1UicAZ6uB
— ᴡɪɴʀᴇɴ (@imwinren) April 10, 2025
धोनी पुन्हा एकदा सीएसकेचे नशीब बदलू शकेल का?
🚨 MS DHONI WILL BE CAPTAINING CSK IN IPL 2025. 🚨
– Ruturaj Gaikwad ruled out due to injury. pic.twitter.com/as1NwVSRsD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2025
ऋतुराज गायकवाड हंगामातून बाहेर पडल्यानंतप, स्वाभाविकच संघाने धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला, जो यावेळी चेन्नईची गरज असल्याचे दिसून येते. या हंगामात संघाची सुरुवात चांगली झालेली नाही आणि पहिल्या सामन्यातील विजयापासून त्यांना सतत पराभवांचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत ५ सामने खेळलेल्या चेन्नईने सलग ४ सामने गमावले आहेत आणि फक्त २ गुणांसह हा संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Ambati Rayudu : ‘कोणी काहीही बोलो…’, सिद्धूशी झालेल्या वादानंतर रायुडूची धोनीच्या समर्थनार्थ पोस्ट
आता सर्वांच्या नजरा धोनीवर असतील, ज्याने २०२२ च्या हंगामाच्या मध्यातही संघाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी रवींद्र जडेजा संघाचा कर्णधार होता, पण सततच्या पराभवानंतर त्याने कर्णधारपद सोडले होते. त्याने धोनीने संघाची सूत्रे हाती घेतली आणि पुढच्या हंगामात चेन्नईला चॅम्पियन बनवले. याआधी धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना सीएसकेने पाच वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.





