Priyanka Nick: प्रियंका चोप्रासोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकले निक जोनस, चाहत्यांनी म्हटलं… जीजू, प्लेलिस्ट शेअर करा

Priyanka Nick : हॉलीवूड गायक निक जोनस आणि त्यांचे भाऊ गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या गाण्यांवर धमाल करताना दिसत आहेत. कधी ऋतिक रोशन–कियारा अडवाणीच्या गाण्यावर, तर कधी इतर लोकप्रिय हिंदी गाण्यांवर ते कॉन्सर्टपूर्वी मजा करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या मजेत स्वतः प्रियंका चोप्राही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
View this post on Instagram
निक जोनसने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक, त्यांचे भाऊ आणि पत्नी प्रियंका चोप्रा सगळे मिळून ‘कुर्बानी’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘आप जैसा कोई’ यावर थिरकत आहेत. हा व्हिडिओ कोणत्याही शूटचा नसून, कॉन्सर्ट सुरू होण्याआधीचा एक मजेशीर क्षण आहे. निकने या गाण्याला आपलं “प्री-शो एनर्जी सॉन्ग” असं म्हटलं आहे.
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “जीजू, तुमची बॉलिवूड प्लेलिस्ट शेअर करा” अशा कमेंट्स केल्या आहेत.
याआधीही जोनस ब्रदर्सनी बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवल्या आहेत. काही काळापूर्वी त्यांनी रणवीर सिंहच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता, ज्यावर रणवीरनेही गंमतीशीर प्रतिक्रिया दिली होती. अलीकडेच निकला ‘वॉर 2’ मधील ‘आवां जावां’ या गाण्यावरही थिरकताना पाहण्यात आलं होतं.
दरम्यान, अलीकडे कपिल शर्मा यांच्या शोमध्ये प्रियंका चोप्राने निकसोबतच्या नात्यातील एक खास आणि रोमँटिक किस्सा सांगितला. करवा चौथच्या दिवशी चंद्र दिसत नसल्यामुळे निकने प्रियंकाला थेट विमानातून ढगांच्या वर नेलं आणि तिथे तिने चंद्रदर्शन करून उपवास सोडला. प्रियंकाच्या या खुलाशाने प्रेक्षकांसह शोमधील कलाकारही थक्क झाले.
निक आणि प्रियंकाची ही केमिस्ट्री आणि बॉलिवूडवरील प्रेम सध्या चाहत्यांच्या मनात घर करून बसलं आहे.





