Priyanka Chopra: हॉलिवूडमध्ये ग्लोबल स्टार म्हणून ओळख मिळवलेली प्रियंका चोप्रा जोनस केवळ आपल्या कामामुळेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील क्षणांमुळेही सतत चर्चेत असते. प्रियंका ही लाडकी मुलगी मालती मेरीची आई असून, ती मुलीसोबतचे सुंदर क्षण सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. मालतीचे स्केच पाहून भावुक झाली प्रियंका अलीकडेच प्रियंकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर मालतीने काढलेलं एक गोंडस स्केच शेअर केलं. फोटोमध्ये मालती आपल्या छोट्या हातांनी काढलेलं स्केच पकडून उभी दिसते, ज्यात एका महिलेने आपल्या लहान बाळाला मिठीत घेतलेलं चित्र आहे. या फोटोसोबत प्रियंकाने लिहिलं, “माँ ने मुझे पकड़ा हुआ है।” सोबतच तिने एक भावनिक इमोजीही शेअर केला. प्रियंका या बालचित्राने खूप भावुक झाल्याचे तिने चाहत्यांना सांगितले. कुटुंबासोबत घालवलेले खास क्षण प्रियंका आणि निक जोनस मुलगी मालतीला भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा सुंदर मेळ सतत अनुभवायला लावतात. काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान मालती आईसोबत सेटवर होती. तेथे तिची भेट सुपरस्टार महेश बाबू यांची मुलगी सिताराशी झाली. दोघींनी एकत्र खूप वेळ घालवला. याच दरम्यान मालतीने राजामौली यांच्या फार्मवरील एका बछड्यालाही भेट दिली, आणि तो अनुभव तिच्या अतिशय आवडत्या आठवणींपैकी एक ठरला. चित्रपटांमध्ये दमदार पुनरागमनासाठी प्रियंका सज्ज कामाच्या आघाडीवर, प्रियंका खूप दिवसांनंतर भारतीय सिनेमात मोठ्या प्रोजेक्टसह पुनरागमन करू पाहते आहे. ती एस. एस. राजामौली यांचा भव्य चित्रपट ‘वाराणसी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंकासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिका साकारणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा चित्रपट 2027 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेले नाही.