Priyanka and Jonas video : प्रियांका अन् निकचा बीचवर रोमाँन्स… हटके कॅप्शनने वेधलं लक्ष, Video पाहा…

Priyanka and Jonas video : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॅालीवूड इंडस्ट्री गाजवल्यानंतर हॅालीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. ती सध्या परदेशात असून, भारतीय चाहत्यांबरोबच तिचा परदेशी चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी शेअर करत असते. नुकताच प्रियांकाने तिचा पती निक जोनास याच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
या व्हिडीओतून प्रियांकाने तिचा पती निक जोनास याच्याविषयी प्रेम व्यक्त केले आहे. या व्हिडिओमध्ये दोघं समुद्रकिनारी प्रेमळ क्षण अनुभवताना दिसत आहेत. सुरुवातीला निक बीचवर एकटा उभे असतो. त्यानंतर प्रियांका त्याच्याजवळ येते. तो तिला उचलून घेतो आणि किस करतो. समुद्र किनाऱ्यावरील दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील दोघांच्याही लूकने लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
लूकबद्दल सांगायचं तर, त्यांनी काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहेत आणि लाल रंगाची कॅपही घातलेली दिसत आहे. या व्हिडिओला ऑडिओ म्हणून बँड ‘जोनास ब्रदर्स’चा नवं गाणं ‘I Can’t Lose’ लावण्यात आले आहे. हा दोघांचा रोमँटिक व्हिडीओ निकने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो प्रियांकाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर पुन्हा शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने Mine असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा : संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला म्हणून मी बोललो; गोपीचंद पडळकरांसोबतच्या वादावर आव्हाडांचा खुलासा





