Priyanka Gandhi | Congress – या वर्षी देशभरात तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काॅंग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. आसाममध्ये उमेदवार निवडीच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी-वाड्रा यांची निय्क्ती पक्षाने केली आहे. गांधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला राज्याच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक राज्य विधानसभेतून मिळालेल्या नामांकनांमधून, सर्वोत्तम उमेदवार निवडणे हे त्यांचे काम असेल. उमेदवारांच्या या पॅनेलवरील अंतिम निर्णय काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीवर अवलंबून आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या व्यतिरिक्त, या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यासह आणखी दोन सदस्यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वीच याच इम्रान मसूद यांनी प्रियंका गांधींविषयी म्हटले होते की, प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा; त्या इंदिरा गांधींप्रमाणेच बांगलादेशला उत्तर देतील, कारण त्या इंदिरा गांधींची नात आहेत. प्रियंका गांधी-वड्रा यांनास्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी का देताना पक्षा एका विशिष्ट रणनीतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे. आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई हे देखील तरुण आहेत. त्यांचे वडील तरुण गोगोई यांनी अनेक वेळा आसामचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते आणि ते १० जनपथच्या जवळ होते. गौरव गोगोई हे लोकसभेत काँग्रेसचे उपनेते आहेत. म्हणजेच राहुल गांधींनंतर काँग्रेस संसदीय पक्षात त्यांचे दुसरे स्थान आहे. गौरव गोगोई, सचिन पायलट आणि जितू पटवारी यांसारखे नेते काँग्रेस नेत्यांच्या नवीन पिढीतील नेते म्हणून पाहिले जातात. या संदर्भात, प्रियांका गांधी-वड्रा यांना गौरव गोगोई यांचे समर्थक म्हणून पाहिले जात आहे. गौरव गोगोई हिमंता बिस्वा सर्मा यांना आव्हान देऊ शकतील, याचा अनेकांना सार्थ विश्वास आहे. प्रत्यक्षात, आसामच्या निवडणुका युतींमध्ये लढवल्या जातात. गेल्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने १२६ पैकी ७५ विधानसभा जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोत आघाडीने ५० जागा जिंकल्या होत्या. तथापि, मतांची टक्केवारी पाहिल्यास, एनडीएने ४३.९ टक्के मते जिंकली, तर महाजोतने ४२.३ टक्के मते जिंकली, म्हणजेच हा फरक फक्त १.६ टक्के होता. काम सोपे नाहीच.! जर अखिल भारतीय आघाडीने आसाममधील प्रादेशिक पक्षांसोबत मजबूत युती केली तर एनडीएला आव्हान देता येईल आणि त्यासाठी योग्य उमेदवार निवडणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या निवडीमध्ये घराणेशाही आणि लाचखोरीचे आरोप काँग्रेस पक्षात सामान्य आहेत. आता, प्रियंका गांधी-वड्रा यांच्या नेतृत्वाखाली, किमान हे आरोप टाळता येतील. आसाममध्ये अनेक लहान पक्ष आहेत. ते अनेकदा निवडणुकीदरम्यान वेगवेगळ्या युतींमध्ये विभागले जातात. गेल्या निवडणुकीत तीन आघाड्यांनी तिथे निवडणूक लढवली होती. प्रियांका गांधी-वड्रा यांच्या संसदेतील कामगिरीनंतर ही जबाबदारी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या काळात काँग्रेसमध्ये त्यांच्यासाठी आणखी मोठी भूमिका मिळू शकते.