‘सरकारला अदानींवर चर्चा नको म्हणून आमच्यावर आरोप’; जॉर्ज सोरोस प्रकरणावरून प्रियांका गांधींची टीका

Priyanka Gandhi on BJP Allegations । काँग्रेस सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी पहिल्यांदाच जॉर्ज सोरोस यांच्यावर भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी थेट संबंध असल्याचा भाजपचा आरोप प्रियंका यांनी पूर्णपणे फेटाळून लावला.
आज माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी यांनी भाजपच्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी, “ही सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे ते करू शकतात. ते 1994 बद्दल बोलत आहेत, आणि याबद्दल कोणाकडेही रेकॉर्ड नाही. ते काय बोलत आहेत ते मला माहित नाही.” कारण त्यांना सभागृह चालवायचे नाही.”असे प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटले.
‘सरकारला अदानींवर चर्चा नको’ Priyanka Gandhi on BJP Allegations ।
केंद्र सरकार अदानी यांच्या मुद्द्यावर चर्चा टाळत असल्याचा आरोप करत प्रियंका गांधी यांनी,”आम्हाला सभागृह चालवायचे आहे, पण सरकारला अदानींवर चर्चा नको आहे. त्यामुळेच ते असे मुद्दे मांडत असतात. सोरोस प्रकरण १९९४ सालचे आहे. आणि अदानीवरील चर्चा टाळण्यासाठी ते आता मुद्दाम उठवत आहेत.” असा थेट आरोप यावेळी प्रियांका यांनी यावेळी केला.
जेपी नड्डा यांच्या आरोपानंतर प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण
सोनिया गांधी यांचे जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध असल्याच्या भाजप प्रमुख जेपी नड्डा यांच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून प्रियंका गांधींच्या या टिप्पण्या आल्या आहेत. काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कल्पनेला कथितपणे समर्थन देणाऱ्या सोरोस फाऊंडेशनने निधी पुरवलेल्या संस्थेशी सोनिया गांधींचे कनेक्शन असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनीही हे आरोप बिनबुडाचे आणि पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत फेटाळले आहेत. नड्डा यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला. अदानी वादासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप हा आरोप करत असल्याचा युक्तिवाद काँग्रेस नेत्यांनी केला.
भाजपनेही विचारले अनेक प्रश्न Priyanka Gandhi on BJP Allegations ।
त्याचवेळी भाजपने अनेक पोस्टमध्ये आरोप केले भाजपने असा दावा केला की फोरम ऑफ द डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक (एफडीएल-एपी) फाऊंडेशनच्या सह-अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी जॉर्ज सोरोस फाऊंडेशनद्वारे अर्थसहाय्यित संस्थेशी संबंधित होत्या. मात्र, काँग्रेसने हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावत भाजपवर निराधार प्रचार केल्याचा आरोप केला आहे.





