Priyanka Chaturvedi : उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Priyanka Chaturvedi : मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाली असल्याची चर्चा आहे. प्रियांका चुतर्वेदी यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीतून निघून गेल्या असल्याची माहिती आहे.

Priyanka Chaturvedi : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांशी संपर्क साधण्याचे काम एकनाथ शिंदेंकडून सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक मातोश्रीवर पार पडली असल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्यसभेवरुन प्रियंका चतुर्वेदी चांगल्याचं भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं? Priyanka Chaturvedi
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला भाजप, राष्ट्रवादीचे लोक सांगतात. तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे.
राज्यसभेसाठी एक जागा महाविकास आघाडीला मिळाली. या जागेवरुन काँग्रेससोबत नेमकी काय चर्चा झाली होती. याबद्दलची माहिती त्यांनी दिली. राज्यसभेच्या जागेसाठी मल्लीकार्जून खर्गे, के. सी वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांचा फोन आला होता.
काँग्रेसच्या म्हणण्यानूसार विरोधी पक्षाच्यापदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला याविषयी सांगितले.

Priyanka Chaturvedi : उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
दरम्यान, अचनाक प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं? असे त्या म्हणाल्या. त्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. यावर ते (संजय राऊत) बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. ते बोलले म्हणून काय झालं शेवटी निर्णय मीच घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यानंतर या बैठकीतून प्रियांका चतुर्वेदी निघून गेल्या.
खासदारांनी आपल्या समस्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्षातील मोठ्या नेत्यांकडून पाठबळ मिळाले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षात नाराजीनाट्य असल्याची चर्चा होत आहे.
तसेच आदित्य ठाकरे आणि इतर मोठ्या नेत्यांनी मुंबईबाहेर पडायला हवे होते, मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरावं अशी विनंती खासदारांनी केली असल्याची माहिती मिळत आहे.





