Eknath Shinde : उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी आयुष्य लाभो.! निरोपाच्या भाषणात शिंदेंकडून कौतुक
त्यांच्या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले....

Eknath Shinde | Uddhav Thackeray – शिवसेनेच्या विभाजनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर कडकडून टीका केली. उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेचे आमदार म्हणून हे शेवटचे अधिवेशन आहे.
त्या निमित्ताने आयोजित निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच साहेब असा उल्लेख केला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
विधान परिषदेतील नऊ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचे कौतुक केले.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो.
त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा. तसेच, एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचेही कौतुक केले. उपसभापती पदावर काम करताना न्यायाची भूमिका घेतली. निलम गोऱ्हे या 24 वर्षे सभागृहात आहेत.
त्यांचा तोल कधी जात नाही, संयम कधी ढळत नाही. त्यांची विचारधारा पक्की आहे. अमोल मिटकरींविषयी बोलताना शिंदे म्हणाले, अमोल मिटकरी बस नाम ही काफी है, त्यांचे नाव अमोल आणि वाणी अमोघ आहे.
ते विदर्भातील फायरब्रँड नेते आहेत. अजितदादांच्या निधनानंतर मिटकरींचे हळवे रुप आपण पाहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत भरभरून बोलणारा वक्ता म्हणजे अमोल मिटकरी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.






