मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून मिळत आहे. या मालिकेत पुन्हा एकदा अभिनेत्री उर्मिला कोठरेच्या एंट्रीने चाहते आनंदी झाले आहेत. मात्र आता या मालिकेतून मोनिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठेने निरोप घेतला आहे. आता तिच्या जागी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रिया, मोनिका ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे निगेटिव्ह रोल असूनही प्रियाला कमालीची लोकप्रियता मिळाली. परंतु, प्रकृतीच्या काही कारणास्तव तिने ही मालिका सोडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तिने स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मी मोनिका कामत हे पात्र साकारत होते. या पुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये. अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भूमिका सोडावी लागल आहे. मोनिका कामत ही भूमिका करताना मला खूप मज्जा येत होती. तुम्हालाही ही भूमिका खूप आवडत होती. तुम्ही तिच्यावर प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना वेळ देऊ शकत होते, तो वेळ कुठेतरी कमी पडत होता म्हणून मी मालिकेतून निरोप घेत आहे. पण भविष्यात लवकरच पुन्हा एका नव्या भूमिकेत आपल्या भेटीला येईल,” असे प्रिया म्हणाली.
https://www.instagram.com/reel/CuOw-4JI4rK/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
तेजस्विनी लोणाची एन्ट्री
प्रियाच्या जागी आता बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मोनिकाची भूमिका साकारणार आहे. तेजस्विनीने या आधी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र बिग बॉस मराठीमुळे ती अधिक चर्चेत आली होती.