Prithviraj Chavan : मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
Prithviraj Chavan : पेपरफुटीच्या महाघोटाळ्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Prithviraj Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रुपया शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून, इराण युद्धाच्या सावटामुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत गॅस आणि पेट्रोलचे दर हळूहळू वाढवत आहे. मोदींच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (Prithviraj Chavan)
‘नीट’ पेपरफुटी घोटाळ्यावरून चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या महाघोटाळ्यात यंत्रणेतील एकाही मोठ्या अधिका-यावर अद्याप कारवाई का झाली नाही? देशात वारंवार पेपर फुटत असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. (Prithviraj Chavan)
तुम्ही काही प्राध्यापकांना अटक केली असली, तरी जोपर्यंत ‘राजाश्रय’ मिळत नाही, तोपर्यंत एवढे मोठे गैरप्रकार होऊच शकत नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. (Prithviraj Chavan)
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सन २०११ पासून देशात किती वेळा पेपरफुटीचे प्रकार घडले, या संदर्भात सरकारने वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. केवळ अधिका-यांच्या बदल्या करून मूळ प्रश्नाला बगल देता येणार नाही. (Prithviraj Chavan)
तुम्ही २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडला आहे, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे. भूतकाळात विलासराव देशमुख किंवा अशोक चव्हाण यांची थेट चूक नसतानाही त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण करून देत चव्हाण यांनी सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांना कसलीच लाज उरलेली नाही, असा टोला लगावला. (Prithviraj Chavan)





