“कारागृहातील बंदी मोबाइलद्वारे नातेवाईकांशी साधणार संवाद..’; अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचा उपक्रम
Updated On:

पुणे – कारागृहातील बंदीवानांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईनबॉक्सऐवजी स्मार्टकार्ड मोबाईल फोनद्वारे वापरता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
योजनेची अमलबजावणी चांगल्यारितीने झाल्यास संपुर्ण राज्यात स्मार्टकार्ड फोन उपक्रमाची अमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.





