पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील कोविड स्थितीचा घेतला आढावा
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील सध्याच्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. देशात कोविड लसीकरणाची जी मोहीम सुरू आहे, त्याविषयीही त्यांनी माहिती घेतली.
देशातील कोविडची दुसरी लाट अजून पूर्णपणे संपलेली नाही, असा दावा कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीला महत्त्व आहे. देशातील 35 जिल्ह्यांमध्ये सध्या कोविड रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांवर असून, अन्य 30 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 5 ते 10 टक्के इतके आहे.
या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी नेमक्या काय सूचना दिल्या याचा तपशील मात्र अजून उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, देशातील 18 टक्के जनतेला करोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. देशात एकूण 72 कोटी लोकांना किमान एक तरी डोस आज अखेरपर्यंत देण्यात आला आहे.





