श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचा मित्र विभूषण पुरस्काराने सन्मान

Prime Minister Modi | श्रीलंका सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेशी चांगले संबंध असलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हा सन्मान देते. भारताचे श्रीलंकेशी ऐतिहासिकदृष्ट्या चांगले संबंध राहिले आहेत. तसेच, जेव्हा श्रीलंका आर्थिक संकटातून जात होता, तेव्हा भारत हा श्रीलंकेला मदतीचा हात देणारा पहिला देश होता. आता या चांगल्या संबंधांना ओळखून श्रीलंका सरकारने पंतप्रधान मोदींना हा सन्मान दिला आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना ‘मित्र विभूषणम सन्मान’ पदक देऊन त्यांचा गौरव केला.
श्रीलंका सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेशी चांगले संबंध असलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हा सन्मान देते. भारताचे श्रीलंकेशी ऐतिहासिकदृष्ट्या चांगले संबंध राहिले आहेत. तसेच, जेव्हा श्रीलंका आर्थिक संकटातून जात होता, तेव्हा भारत हा श्रीलंकेला मदतीचा हात देणारा पहिला देश होता. आता या चांगल्या संबंधांना ओळखून श्रीलंका सरकारने पंतप्रधान मोदींना हा सन्मान दिला आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना ‘मित्र विभूषणम सन्मान’ पदक देऊन त्यांचा गौरव केला.
सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते श्रीलंका मित्र विभूषणाय पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझ्यासाठीच नाही तर १४० कोटी भारतीयांसाठी सन्मान आहे. हे श्रीलंका आणि भारताच्या लोकांमधील ऐतिहासिक संबंध आणि खोल मैत्रीचे प्रतिबिंब आहे आणि यासाठी मी राष्ट्रपती, श्रीलंका सरकार आणि येथील लोकांचे आभार मानतो.
पुढे म्हणाले ‘भारत आणि श्रीलंकेचे शतकानुशतके जुने आध्यात्मिक आणि प्रेमळ संबंध आहेत. मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की १९६० मध्ये गुजरातमधील अरवली येथे सापडलेले भगवान बुद्धांचे अवशेष श्रीलंकेला पाहण्यासाठी पाठवले जात आहेत. त्रिंकोमाली येथील तिरुकोनेश्वरम मंदिराच्या नूतनीकरणासाठी भारत मदत करेल, असे मोदी म्हणाले.
आम्ही मच्छीमारांच्या उपजीविकेशी संबंधित मुद्द्यांवर देखील चर्चा केली. या प्रकरणात आपण मानवतावादी मदत घेऊन पुढे जावे यावर आमचे एकमत झाले. आम्ही मच्छिमारांची तात्काळ सुटका आणि त्यांच्या बोटी परत करण्यावरही भर दिला. भारत आणि श्रीलंकेतील संबंध परस्पर विश्वास आणि सद्भावनेवर आधारित आहेत, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
‘श्रीलंका मित्र विभूषण सन्मान’ पदकाचे विशेष काय?
श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारात बौद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या धर्मचक्र असलेले रौप्य पदक असते. या बौद्ध वारशाने भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक परंपरांना आकार दिला आहे. पदकात कोरलेला पुन कलश (एक औपचारिक पात्र) समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे. पदकावर कोरलेले नवरत्न दोन्ही देशांमधील अमूल्य आणि चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक आहे. सूर्य आणि चंद्र हे प्राचीन भूतकाळापासून अनंत भविष्यापर्यंत पसरलेल्या बंधनाचे प्रतिनिधित्व करतात.
#WATCH | Colombo | Prime Minister Narendra Modi says, “…Today, to be honoured with the Sri Lanka Mitra Vibhushan award by President Anura Kumara Dissanayake—it’s not an honour to me but to 140 crore Indians. It shows the historical relation and deep friendship between the… https://t.co/YQzcwp16n0 pic.twitter.com/wCzYZUin8b
— ANI (@ANI) April 5, 2025





