Rahul Gandhi : “आंदोलकांवरील कारवाईबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागावी” – राहुल गांधी
आंदोलकांवरील पोलीस कारवाईबद्दल मोदींनी माफी मागायला हवी, असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. तिसरा महत्वाचा मुद्दा राम मंदिर देणगी चोरीचा आहे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi – कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा कायम ठेवत ३ मुद्द्यांवर जोर दिला. त्यातून विद्यार्थी आंदोलकांवर पॅलेट गनच्या वापराचा आदेश कुणी दिला याचे उत्तर पक्षाला हवे असल्याचे स्पष्ट झाले.
आंदोलकांवरील कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी चर्चा व्हावी या मागण्यांवर कॉंग्रेस ठाम असल्याचेही समोर आले.
केंद्र सरकारच्या वतीने रिजीजू यांनी भूमिका मांडल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी बोलताना राहुल म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सामान्य विषयांवर भाषण करण्यात देशाला कुठलाही रस नाही.
दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पॅलेट गन चालवण्याची परवानगी कुणी दिली याचे उत्तर शहांनी द्यायला हवे. तसा आदेश शहांनी दिला असेल; तर ते दोषी आहेत. संबंधित आदेशाची माहिती शहांना नसेल; तर ते गृहमंत्री म्हणून असमर्थ आहेत. दोन्ही स्थितींमध्ये त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
आंदोलकांवरील पोलीस कारवाईबद्दल मोदींनी माफी मागायला हवी, असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. तिसरा महत्वाचा मुद्दा राम मंदिर देणगी चोरीचा आहे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. देणगी प्रकरणी मोदींनी निवेदन द्यावे, अशी मागणी खर्गे यांनी केली.





