“प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच मिळालं पाहिजे”; हिंदी भाषेच्या सक्तीवरून RSSने स्पष्ट केली भूमिका

RSS Leader Sunil Ambekar | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं. दिल्ली संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची तीन दिवसांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत RSSने घेतलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मते देशातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे,” असं वक्तव्य संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केलं आहे. याद्वारे आरएसएसने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मतांपासून वेगळी भूमिका मांडली असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच मिळालं पाहिजे’
सुनील आंबेकर म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप आधीपासूनच भूमिका आहे की भारतातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात राहणारे लोक तिथली भाषा, आपापली मातृभाषा बोलतात. त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतच मिळालं पाहिजे असा आग्रह असतो. मातृभाषेत शिक्षण ही गोष्ट खूप आधीपासूनच ठरलेली आहे.”
आरएसएस ने त्रिभाषा सूत्र का विरोध किया है, आरएसएस कहता है मातृभाषा सर्वश्रेष्ठ है, देश की प्रत्येक भाषा को राष्ट्रभाषा होना चाहिए। यही सही है। हमने कभी एक भाषा के रूप में हिंदीविरोध नहीं किया। हमारा इतना कहना है कि प्रास्कूलों में बच्चों पर हिंदी भाषा का अतिरेक नहीं करना चाहिए! pic.twitter.com/9H0hA0vqli
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 7, 2025
संजय राऊत प्रतिक्रिया
यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनील आंबेकर यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करत त्रिभाषा धोरणाला आरएसएसचा विरोध असल्याचे म्हटलं. “भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध! मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे! मग महाराष्ट्रात भाषेवरून भांडणे का लावली जात आहेत?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली होती. मात्र, जनतेच्या विरोधानंतर सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला. परंतु, आता राज्यात हिंदी व मराठी भाषेवरून वाद चालू झाल्याचे दिसत आहे. RSS Leader Sunil Ambekar |
दुसरीकडे, देराष्ट्रीय स्वंय संघाचा शताब्दी सोहळा यावर्षी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिल्लीत 4 ते 6 जुलै दरम्यान संघाच्या प्रांत प्रचारकांची बैठक झाली आहे. या बैठकीत शताब्दी सोहळा कसा साजरा करायचा याचीही रुपरेषा ठरवण्यात आली आहे. RSS Leader Sunil Ambekar |
हेही वाचा:





