राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची राफेल भरारी; अंबाला एअरबेसवरून केले ऐतिहासिक उड्डाण

Droupadi Murmu Rafale flight | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरून राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानातून उड्डाण केले. यावेळी त्यांचा एक वेगळा लुक पाहायला मिळाला. या निमित्ताने त्यांनी फायटर पायलटचा विशेष सूट परिधान केला होता. विशेष म्हणजे राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. यावेळी त्यांच्यासोबत एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग हेदेखील विमानात उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी ज्या विमानातून उड्डाण केले, त्याचे संचालन एका महिला वैमानिकाने केले. यापूर्वी, २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून उड्डाण करून इतिहास रचला होता. तर ८ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी आसाममधील तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई-३० मधून उड्डाण घेतले होते. मात्र, राफेल फायटर जेटमधून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. Droupadi Murmu Rafale flight |
#WATCH | President Droupadi Murmu takes a sortie in a Rafale aircraft in Ambala, Haryana
Indian Air Force chief Air Chief Marshal AP Singh is also flying in another aircraft
Group Captain Amit Gehani is the pilot of the aircraft carrying the President. He is also the Commanding… pic.twitter.com/f3WRhGF0Nx
— ANI (@ANI) October 29, 2025
लष्करी जवानांना प्रोत्साहन राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असल्याने, त्यांनी अशाप्रकारे देशाच्या सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानामध्ये उड्डाण केल्याने भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांमध्ये उत्साहाचे आणि प्रोत्साहनाचे वातावरण निर्माण झाले आहे. याद्वारे जगाला भारताच्या सामरिक ताकदीची झलक पाहायला मिळाली आहे.
यापूर्वी दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही लढाऊ विमानातून प्रवास केला होता. आता द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधून उड्डाण केले आहे. Droupadi Murmu Rafale flight |
हेही वाचा:
‘मल्लाहचा मुलगा उपमुख्यमंत्री बनू शकतो, तर मग मोहम्मदचा मुलगा का नाही?’ ओवैसींचा थेट सवाल





