Ajit Pawar : :अजित पवारांच्या योगदानाची कायम आठवण राहील” – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
अजित पवार यांचे अकाली निधन ही अपूरणीय हानी असून महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकारी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांची कायम आठवण राहील, असे त्यांनी नमूद केले आहे.

Ajit Pawar । Droupadi Murmu : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे.
संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. अनेकांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : Riteish Deshmukh post : “महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी…”; रितेश देशमुखने व्यक्त केला शोक! तो फोटो शेअर करत म्हणाला…
अजित पवार यांचे अकाली निधन ही अपूरणीय हानी असून महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकारी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांची कायम आठवण राहील, असे त्यांनी नमूद केले आहे. राष्ट्रपतींनी पवार कुटुंबीयांसह समर्थक आणि चाहत्यांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना या आघाताला सामोरे जाण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट :
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे.
प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.’
ही बातमी वाचा :
Ajit Pawar : गॉगल आणि घड्याळावरून आम्ही दादांना बाहेर काढले…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव





