‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने गाठला 450 भागांचा पल्ला, कलाकारांनी केक कापत सेटवर केले जंगी सेलिब्रेशन

Premachi Goshta TV Show: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीमध्ये देखील मालिका सातत्याने पुढे असल्याचे दिसून आले आहे. आता या मालिकेने एक नवीन टप्पा गाठला आहे. मालिकेने नुकताच 450 भाग पूर्ण केले. या निमित्ताने कलाकारांनी सेटवर केक कापत सेलिब्रेशन केले.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेत ‘मुक्ता’ हे प्रमुख पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधानने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेजश्रीच्या जागी आता स्वरदा ठिगळे ही प्रमुख भूमिका साकारत आहे. अचानक मोठा बदल झाला असला तरीही मालिकेची लोकप्रियता कायम आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ टीआरपीमध्ये सातत्याने पहिल्या तीन मालिकांमध्ये कायम आहे. यातील मुक्ता आणि सागर या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याशिवाय, इतर पात्रं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकताच या मालिकेने 450 भागांचा टप्पा पूर्ण केला असून, त्यानिमित्ताने कलाकारांनी सेलिब्रेशन केले.
View this post on Instagram
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि स्टार प्रवाहने सेलिब्रेशनचा व्हीडीओ शेअर केला आहे. व्हीडिओ शेअर करत लिहिले की, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने 450 भाग पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! हा टप्पा संपूर्ण टीम आणि चॅनेलच्या समर्पण व परिश्रमाचा पुरावा आहे. सर्व आव्हाने आणि अडचणी असूनही, आम्ही पुन्हा एकदा अधिक मजबूतीने उभे राहिलो. या प्रवासाचा भाग असल्याचा अभिमान आहे! पुढील अनेक टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा!’
दरम्यान, आता या मालिकेत मुक्ता हे पात्र अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही साकारत आहे. मालिकेत अचानक मोठा बदल झाल्याने प्रेक्षकांनी आधी नाराजी व्यक्त केली होती. या मालिकेतील राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, इरा परवडे, उमेश घाडगे, कोमल सोमारेसह इतर कलाकारांनी त्यांच्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.





