Marathi TV Show: ‘आता होऊ दे धिंगाणा’ने गाठला 100 भागांचा टप्पा, प्रेक्षकांचे आभार मानत सिद्धार्थ जाधव म्हणाला…

Marathi Serial Aata Hou De Dhingana : आपल्या मालिकेने 100, 200 भागांचा टप्पा गाठावा असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे काही मालिका वर्षानुवर्ष चालतात. मालिकेने शेकडो भागांचा टप्पा गाठणे म्हणजे एकप्रकारे कलाकाराच्या कामाची पावतीच असते. नुकतेच स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ या रिएलिटी शोने 100 भागांचा टप्पा गाठला. या निमित्ताने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचा तिसरा सीझन सुरू आहे. पहिल्या 2 सीझनप्रमाणेच या सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. प्रसिद्ध कलाकारांची कार्यक्रमातील हजेरी व हटके खेळ यामुळे हा रिएलिटी शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. आता कार्यक्रमाने 100 भागांचा टप्पा गाठला आहे.
या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, काय आणि कसे आभार मानू स्टार प्रवाह टीमचे मला कळत नाही. आता होऊ दे धिंगाणाचा शंभरावा एपिसोड. मी या कार्यक्रमाचा भाग होईन किंवा हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळेल आणि महाराष्ट्राचे मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील हे कधीच वाटलं नव्हतं.
View this post on Instagram
‘मी खूप वेळा पाहायचो की ह्या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले, या मालिकेने 200 भाग पूर्ण केले, या मालिकेने 300 भाग पूर्ण केले. पण आता मी त्या एका कार्यक्रमाचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केले. हा एक कथा बाह्य कार्यक्रम आहे आणि गेले तीन वर्ष मी हा शो होस्ट करतोय.
याच सगळं क्रेडिट जातं स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे, श्रीप्रसाद क्षीरसागर, सुमेध, चिन्मय, अद्वैत दादा, निखिल, दीप सर, फ्रेम्स कंपनी आणि संपूर्ण टीमला. शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय आहे. पण येस मी पण अशा एका कलाकृतीचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड्स पूर्ण केलेत आणि हे शक्य झालं तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे, असे म्हणत त्याने प्रेक्षकांचे देखील आभार मानले.





