प्रेमाची गोष्ट! मराठी मालिकेतील अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाह, 9 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर अडकला लग्नाच्या बेडीत

Marathi Actor Rajas Sule Got Married: सध्या मराठी कलाकारांमध्ये लगीनघाई सुरू आहे. छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मराठी कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, किरण गायकवाड , शाल्व किंजवडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. आता या यादीमध्ये आणखी एका मराठी कलाकाराचे नाव जोडले गेले आहे. स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मिहीर हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता राजस सुळेने लग्न केले आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील राजस सुळेने साकारलेल्या मिहीर या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता 9 वर्ष रिलेशनशीपमध्ये होता. 9 वर्षांच्या रिलेशननंतर अभिनेत्याने चैत्राली पितळेसह थाटामाटात लग्न केले. #RajChaLagna असा हटके हॅशटॅग वापरत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
लग्नामध्ये राजसने सोनेरी फेट्यासह राजेशाही पेहराव घातला होता. तर चैत्रालीने वळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. दोघेही जण या लूकमध्ये सुंदरमध्ये दिसत होते. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्यांना कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
काही महिन्यांपूर्वीच एका युट्यूब चॅनेलशी बोलताना राजसने त्याच्या नात्याबद्दल माहिती दिली होती. यावेळी त्याने प्रेयसीचा फोटो देखील दाखवला होता. दरम्यान, अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मिहीर हे पात्र साकारत आहे. त्याने ‘हर हर महादेव’ चित्रपटातही काम केले आहे.




