‘चला निरोप घेते…’ वर्षभरापूर्वीच सुरू झालेली ‘ही’ लोकप्रिय मराठी मालिका होणार बंद, मुख्य अभिनेत्रीची भावूक पोस्ट

Punha Kartavya Aahe TV Show | मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील काही मालिका टीआरपीमध्ये सर्वात पुढे आहेत, तर काही मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी जुन्या मालिकांच्याजागी नवीन मालिका आणले जाते. आता वर्षभरापूर्वीच सुरू झालेली लोकप्रिय मराठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
झी मराठीवर गेल्यावर्षी मार्च महिन्यात ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका सुरू झाली होती. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रिकरण पार पडले. या निमित्ताने मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या.
या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिने वसुंधरा, तर अभिनेता अक्षय म्हात्रे याने आकाश ही भूमिका साकारली आहे. मालिकेत अक्षया, अक्षयसोबतच वंदना सरदेसाई, मृणाल देशपांडे, सिद्धेश प्रभाकर, सुदेश म्हाशीलकर, वंदना गुप्ते या कलाकारांचीही महत्त्वाची भूमिका आहे. अल्पावधीतच या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
या निमित्ताने अक्षयाने ‘चला निरोप घेते’ अशा कॅप्शनसह सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आज पाऊल निघत नव्हतं. चला निरोप घेते…मला या क्षणाला काय वाटतंय हे मी खरंच शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली. अनेक आठवणी माझ्याबरोबर घेऊन मी चालले आहे. खूप प्रेम.’, अशा शब्दात अक्षयाने भावना व्यक्त केल्या. दरम्यान, या मालिकेच्या जागी कोणती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत माहिती अद्याप झी मराठीने माहिती दिलेली नाही.





