पौड येथे मान्सून पूर्व आढाव बैठक संपन्न

पौड : मुळशी तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची, नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी आढावा बैठक पंचायत समिती मुळशी येथील सेनापती बापट सभागृह येथे चार वाजता पार पडली.यावेळी बैठकीत सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील असणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजनाची माहिती मावळ मुळशी उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार रणजित भोसले यांनी आढावा घेतला.
मुळशी मधील नैसर्गिक आपत्ती यामध्ये प्रामुख्याने महावितरणचा विद्युत पुरवठा शक्यतो खंडित झाला नाही पाहिजे. झाला तर लवकर सुरू व्हावा.बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्ते दुरुस्त करून घेणे. आरोग्य विभागनुसार नागरिकांना आरोग्य यासाठी उपाययोजना करावे. पोलिसांनी आपत्तीच्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेची आहे. आपत्तीची माहिती मिळण्यासाठी कोतवाल,पोलीस पाटील,यांना सूचना द्याव्यात जेणेकरून मदत लवकर पोहचेल अशा प्रत्येक विभागाला सूचना देण्यात आल्या.
सध्या चाले पुलाचे काम अर्धवट झाले असल्याने पर्यायी तयार करण्यात आलेला पूल पाण्याखाली गेला होता याकरिता कोळवण खोऱ्यातील नागरिकांना जाणे येण्यासाठी पर्यायी मार्गांवर चाले -मुगावडे – घोटावडे – अंबरवेट – दारवली – पौड रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे व साईड पट्टी तयार करत आहोत. चाले पुलाचे काम 20 जून पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होत परंतु अचानक पाऊस आल्याने नदीत पाणी वाढल्यामुळे काम करता येत नाही. पाणी कमी झाल्यावर पुन्हा काम सुरु करता येईल असे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सर्व विभागाने कोणत्या समस्या व त्यावरील उपाय योजना याची माहिती लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन ही केले आहे
यावेळी मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार रणजित भोसले ,गट विकास अधिकारी मुळशी सुधीर भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस मनोज कदम, नायब तहसिलदार अमित कदम, तालुका कृषी अधिकारी हनुमंत, तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात आपत्ती काळात रुग्णवाहिका तयार पाहिजे धर्मदाय रुग्णालयाबाबत शासन गंभीर आहे या मान्सूनमध्ये या मान्सूनमध्ये सिम्बॉयसिस हॉस्पिटल कडून कोणत्याही प्रकारची हलगर्जी नको येणाऱ्या पेशंटची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे असे सुरेंद्र नवले उपविभागीय अधिकारी, मावळ मुळशी यांनी सिम्बॉयसिस हॉस्पिटल व्यवस्थापन प्रतिनिधी यांना सांगितले.





