Hasan Mushrif on Abu Azmi | दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले आहे. यादरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना वारी संदर्भात केलेल्या विधानामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. वारीमुळे वाहतुकीला अडथळा होतो, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले होते. ज्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले की, “अबू आझमी यांना वारी, वारकरी संप्रदायाबद्दल माहिती नाही असे दिसते. त्यातून त्यांनी हे विधान केले असेल. वारीचा मार्ग ठरलेला असतो. वर्षानुवर्षे त्या मार्गावरून वारी सुरू आहे. शासनाने त्यासाठी पालखी मार्गही बनवला आहे.” “नमाज ही दिवसातून पाचवेळा असते, तर वारी वर्षातून एकदा असते. नमाजही अशा ठिकाणी असला पाहिजे जेथे कोणाला त्रास होणार नाही. अबू आझमी भेटले की त्यांना वारी म्हणजे काय हे समजावून सांगतो,” असंही मुश्रीफ म्हणाले आहेत. तर अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असून, आपला हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. Hasan Mushrif on Abu Azmi | अबू आझमींनी मागितली माफी – “जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता,” असे अबू आझामी यांनी म्हटले आहे. अबू आझामींचे वादग्रस्त विधान काय होते? “आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा यूपीचे मुख्यमंत्री म्हणतात की, जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही,” असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. Hasan Mushrif on Abu Azmi | हेही वाचा : हातात सलाइन दाखवत अमृता खानविलकरचा व्हिडीओ; केदारनाथ यात्रेवरून परतल्यानंतर तब्येत बिघडली