हातात सलाइन दाखवत अमृता खानविलकरचा व्हिडीओ; केदारनाथ यात्रेवरून परतल्यानंतर तब्येत बिघडली

Actress Amrita Khanwilkar : नुकतीच अभिनेत्री अमृता खानविलकर केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा पूर्ण केली आहे. मात्र, घरी परतल्यानंतर तिची प्रकृची अचानाक बिघडली आहे. त्यामुळे अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही व्हिडीओ शेअर करत केदारनाथला जाण्याची योजना आखणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा नुकतीच पूर्ण केली. दोघींनीही केदारनाथचे दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले. मात्र, घरी परतल्यानंतर अमृताची तब्येत अत्यंत बिकट झाली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत हातात सलाइन लावल्याचे दाखवले आहे. तसेच या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची क्षमता समजून घेणे आवश्यक असल्याचे ती व्हिडीओत सांगत आहे.
View this post on Instagram
नेमकं काय म्हणाली अमृता?
मी काल केदारनाथवरून आले आणि आज सलाइन लावावं लागलं. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मी प्रचंड आजारी होते, पण मी तिथे डोलो गोळी घेऊन काम चालवत होते. पण आता जे लोक केदारनाथला जाणार आहेत त्यांना मी एक सांगू इच्छिते की, केदारनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 11,000 फूट उंचीवर आहे. ते खूप वरती आहे. त्यामुळे या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची क्षमता समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तिथे जाणार असाल तर त्यानुसार शरीराला नव्या हवामानाची सवय करुन घ्या, असा सल्ला तिने ही यात्रा करणाऱ्यांना दिला आहे.





