Praveen Gaikwad Press : प्रवीण गायकवाड यांचा बावनकुळेंवर गंभीर आरोप; अॅडिओ पुरावा असल्याचा दावा, म्हणाले “चार दिवसांपासून…”

Praveen Gaikwad Press : संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे तोंडाला काळं फासण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्लाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.
या घटनेने राजकीय वातावरही ढवळून निघाले होते. अशातच गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत हल्ल्यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर घटनेची माहिती दिली. तसेच हल्ल्याच्या कटाची रेकी चार दिवसांपासून सुरू होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
मास्टरमाइंट असल्याचा गंभीर आरोप
प्रवीण गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मास्टरमाइंड असल्याचा थेट आरोप केला असून यासंदर्भात अॅाडिओ पुरावे असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सनसनाटी आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ” चार दिवसांपासून हल्ल्याची रेकी झाली होती, आणि हल्लेखोरांनी मला कार्यक्रमातून बाहेर पडताच लक्ष्य केले. भाजपच्या पीआर एजन्सींनी हल्ल्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले, पण कारवाई टाळली,” असा आरोपही त्यांनी केला आहे.
गायकवाडांचा सवाल
या हल्ल्यात शिवधर्म फौउडेंशनच्या कार्यकर्त्यांवर आरोप ठेवण्यात आला आहे. दीपक काटे यांचे नाव यामध्ये आले आहे. काटे यांचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणात काटेला जामीन मंजूर झाला असल्याची माहिती आहे. यावर बोलताना आर्म अॅक्टअंतर्गत जामीन मिळणे कठीण असताना दीपक काटे बाहेर कसे फिरत आहे, असा सवाल गायकवाड यांनी सरकारला विचारला आहे.
पोलिसांच्या कारवाईवर हलगर्जीपणाचा आरोप
गायकवाड यांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनीही योग्य कारवाई न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपला पुरोगामी संघटनांची भीती वाटते, म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
हेही वाचा : विद्या बालनचा नवा लूक पाहून सारेच थक्क…





