भाजप खासदार प्रताप सारंगी जमखी ; म्हणाले,”राहुल गांधींनी धक्काबुक्की”

Pratap Chandra Sarangi । काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली. दरम्यान, भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केली, त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्यासह भाजपच्या खासदारांनी संसदेच्या मकर गेटवर धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
प्रतापचंद्र सारंगी यांनी केला ‘हा’ आरोप Pratap Chandra Sarangi ।
भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले, “राहुल गांधींनी धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिला. त्यानंतर ते माझ्या अंगावर कोसळले त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Delhi | BJP MP Pratap Chandra Sarangi says, “Rahul Gandhi pushed an MP who fell on me after which I fell down…I was standing near the stairs when Rahul Gandhi came and pushed an MP who then fell on me…” pic.twitter.com/xhn2XOvYt4
— ANI (@ANI) December 19, 2024
राहुल गांधींनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण Pratap Chandra Sarangi ।
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा मी संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमक्या देत होते, त्यामुळे हे घडले. हे संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की ते संविधानावर हल्ला करत आहेत.”असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला केला.
माणिकम टागोर यांनी केलं मोठं विधान
या घटनेबाबत काँग्रेसचे खासदार बी. माणिकम टागोर म्हणाले की, “भाजपचे लोक नाटक करत आहेत. या घटनेबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या संकुलातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर निषेध मोर्चा काढला.
‘भाजपने आंबेडकरांचा अपमान केला’
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले, “ते (भाजप) त्यांच्या स्वसंरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. कालच त्यांनी अमित शहांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची खूप हानी केली. काल भाजपच्या सोशल मीडियाने काय केले? त्यांनी आंबेडकरांची जागा घेतली. सोरोस यांचे छायाचित्र पोस्ट केले. आणि ते पुन्हा आंबेडकरांचा अपमान करत आहेत, हे लोक काय करत आहेत हे मला माहीत नाही.” असे त्यांनी म्हटले.





