“‘दोन हाना, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था” ; ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपची जोरदार टीका

Prasad Lad on Uddhav Thackeray । माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाची घोषणा करावी, अशी मागणी केली. त्यासोबतच शरद पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ज्याला मुख्यमंत्री करतील त्याला मी पाठिंबा देईन, असेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांनी केलेल्या मागणीनंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरेंच्या मागणीवरून ‘दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली असल्याचे म्हटले आहे.
मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं Prasad Lad on Uddhav Thackeray ।
प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने असंख्य शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची? याची परिसीमा त्यांनी ओलांडली आहे” असा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणही सहभागी झाले होते.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ? Prasad Lad on Uddhav Thackeray ।
दरम्यान, मुंबईतील पार पडलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी,”कोरोनाच्या काळात आम्ही खूप काम केले, म्हणूनच मुस्लिम आमच्यासोबत आले. एनआरसी आणि सीएए दरम्यान मुस्लिमांच्या मनात भीती होती, पण मी त्यावेळी म्हटलं होतं की, ज्याला देशावर प्रेम आहे, त्याला जाऊ देणार नाही, म्हणून मुस्लिम एकत्र आले” असे वक्तव्य केले. तसेच पुढे बोलताना मोदी नितीश आणि चंद्राबाबू नायडूंसोबत बसले तर आता त्यांनी हिंदुत्व सोडले असे मानावे का? केवळ वक्फ बोर्डातच नाही तर हिंदू मंदिरांच्या बाबतीतही जेपीसी चौकशी व्हायला हवी. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही लोकसभेत विधेयक आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. जरी त्यांनी आमचे धनुष्य आणि बाण चोरले, तरीही मी त्यांना जाळण्यासाठी मशाल पेटवली आहे.” असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.





