प्राजक्ता कोळी अडकली विवाहबंधनात; कर्जतमध्ये धूमधडाक्यात पार पडला सोहळा

Prajakta Koli Wedding | लोकप्रिय युट्यूबर प्राजक्ता कोळीने वृषांक खनालसोबत लग्नगाठ बांधली आहे. प्राजक्ताने तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्राजक्ता कोळी व वृषांक खनल यांनी कर्जतमध्ये लग्न केलं. या लग्नाला प्राजक्ता-वृषांकचे कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित होते. मेहंदी, हळदी समारंभ, संगीत नाईटनंतर या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नात प्राजक्ता व वृषांकने अनिता डोंगरेने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.
प्राजक्ताने लग्नात आयव्हरी रंगाचा पेस्टल रंगाचे वर्क असलेला लेहेंगा तर वृषांकने पांढरी शेरवानी परिधान केली होती. दोघांच्याही लग्नातील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या प्राजक्ता आणि वृषांक प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वृषांक खनाल कोण आहे?
प्राजक्ता कोळीने 2023 मध्ये वृषांकसोबत साखरपुडा केला. वृषांक हा काठमांडू, नेपाळचा आहे. एका मित्राच्या माध्यमातून त्याची प्राजक्ताशी ओळख झाली होती. गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले. आता अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.
वृषांक खनाल हा वकील असून तो मुंबईत राहतो. तर त्याचे कुटुंबीय नेपाळमध्ये राहतात. प्राजक्ता बरेचदा वृषांकबरोबर त्याच्या घरी नेपाळला जात असते. प्राजक्ता कोळी एक लोकप्रिय युट्यूबर आहे. तिला सर्वत्र ‘मोस्टलीसेन’ या नावाने ओळखली जाते.
हेही वाचा:
Pune : पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ अल्पवयीनावर ‘प्रौढ’ म्हणून खटला चालणार?



