Prajakta Koli : नाकात नथ… हातात हिरवा चुडा…प्राजक्ताचा मराठमोळ लूक पाहिलात का? हे घ्या Engagement फोटो

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

प्राजक्ता कोळीनेही तिच्या म्युझिकल नाईटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता मराठामोळ्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ता तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर एन्जॅाय करताना दिसत आहे. हे दोघेही फोटोंमध्ये खूपच क्युट दिसत आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये दिसत आहे. प्राजक्ताने लाल साडी आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत. प्राजक्ताने साडीसोबत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतिक असलेली सुंदर नथ नाकामध्ये घातली आहे. यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. प्राजक्ता तिच्या होणारा नवरा वृषांकसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याच्या हातात शॅम्पेनचा ग्लासही आहे.

प्राजक्ता आणि वृषांकच्या लग्नाआधी दोघांचा एक डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. मेहंदी फंक्शन दरम्यानही झिंगाट गाण्यातील प्राजक्ताचा डान्स चांगलाच व्हायरल होत होता. यापूर्वी प्राजक्ताने तिच्या मेहंदी फंक्शनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली होती. प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. प्राजक्ता आणि वृषाक हे दोघेही २५ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत. ते दोघेही गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Saxena : ज्येष्ठ अभिनेते शरद सक्सेना यांचे रुग्णालयातील फोटो समोर; सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Sharad Saxena : ज्येष्ठ अभिनेते शरद सक्सेना यांचे रुग्णालयातील फोटो समोर; सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Tejaswini Pandit : "डोक्यावरुन कुणी मायेचा हात फिरवणार नाही", आई-वडिलांच्या आठवणीत तेजस्विनीची भावुक पोस्ट

Tejaswini Pandit : "डोक्यावरुन कुणी मायेचा हात फिरवणार नाही", आई-वडिलांच्या आठवणीत तेजस्विनीची भावुक पोस्ट

Salman Khan: "माझा मोठा भाऊ..."; सलमान खानची खास मित्रासाठी पोस्ट

Salman Khan: "माझा मोठा भाऊ..."; सलमान खानची खास मित्रासाठी पोस्ट

Rohit Pawar : पुरावेच लागतात ना? अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..! महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते : रोहित पवार

Rohit Pawar : पुरावेच लागतात ना? अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..! महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते : रोहित पवार