13 वर्षांच्या डेटिंगनंतर बॉयफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार प्राजक्ता कोळी, ‘या’ तारखेला करणार लग्न

Prajakta Koli | अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ता वृषांक कनालसोबत लग्न करणार आहे. गेली अनेक वर्षांपासून दोघेजण एकमेकांना डेट करत आहेत. आता अखेर दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
सोशल मीडियावर ‘मोस्टलीसेन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राजक्ता कोळीने चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. याशिवाय, तिची प्रमुख भूमिका असलेली नेटफ्लिक्सवरील ‘मिसमॅच’ ही सीरिज देखील विशेष गाजली. या सीरिजमधील तिच्या डिंपल या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता प्राजक्ता लवकरच लग्न करणार आहे.
प्राजक्ता 25 फेब्रुवारी 2025 ला वृषांक कनालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही मागील 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी साखरपुडा देखील केला होता. अखेर, आता या नात्याला लग्नाचे नाव देणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
तसेच, प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचे तर 34 वर्षीय वृषांक हा नेपाळच्या काठमांडू शहरातील आहेत. त्याने केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. वृषांक हा वकील असण्यासोबतच, इन्व्हेस्टमेंट बँकेत काम करतो.


