Purushottam Kadalag : शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक! नेमकं प्रकरण काय?

Purushottam Kadalag : नाशिक येथील शरद पवार गटाच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

Updated On:
Purushottam Kadalag : शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक! नेमकं प्रकरण काय?

Purushottam Kadalag : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे ‘व्हीआयपी दर्शन’च्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. Purushottam Kadalag

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात ‘लवकर दर्शन’ घडवून देण्याचे आमिष दाखवत भाविकांकडून हजारो रुपये उकळले जात होते. 11 एप्रिल रोजी पंचवटी येथील भाविक अनंता मेहंदळे आणि त्यांच्या मित्रांकडून अधिकृत 200 रुपयांचा पास असतानाही संशयितांनी 10 मिनिटांत दर्शन घडवून देण्याचे आश्वासन देत 3 हजार रुपये उकळले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी गोटीराम पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोटीरामला अटक करण्यात आली असून अभिषेक सध्या फरार आहे. चौकशीत या रॅकेटमध्ये स्वतः विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचा सहभाग उघड झाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. Purushottam Kadalag

या प्रकरणामुळे मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कडक नियम असूनही बाहेरील एजंट भाविकांना थेट मंदिरात प्रवेश कसा देत होते, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

आता विश्वस्तालाच अटक झाल्याने हा गैरप्रकार संस्थानच्या आतपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षक काय म्हणाले? Purushottam Kadalag

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, स्टिंग ऑपरेशनद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. एजंट 3 हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत रक्कम घेत होते आणि दररोज 100 ते 150 भाविकांना शॉर्टकटने दर्शन घडवले जात होते.

या प्रकरणात विश्वस्तांचे दोन नातेवाईक आणि एक एजंट अटकेत असून इतर संशयितांचाही शोध सुरू आहे. विश्वस्तपदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांवर टीका

हे प्रकरण समोर आल्यानंतर आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी नास्तिक आणि निधर्मी विचारांचे कार्यकर्ते घडवल्याने ते देवस्थानात सुद्धा भ्रष्टाचार करतात हे समोर आले आहे, असे त्यांनी एक्सवरील ट्वीटमध्ये म्हटले आहे. Purushottam Kadalag

हेही वाचा : Rajma Chawal: भारतीय ‘राजमा-चावल’ची जगभर धूम!; टॉप 50 डिशमध्ये दमदार एन्ट्री!

आणखी संबंधित बातम्या

Nashik News : हृदयद्रावक ! नाशिकच्या काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू

2026-05-27 18:03:47

Nashik News : हृदयद्रावक ! नाशिकच्या काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू

चर्चेत : कांद्याचे गणित

2026-05-27 05:00:55

चर्चेत : कांद्याचे गणित

Rohit Pawar : 'ते' वक्तव्य अन् आता बारामतीत जनता दरबार; रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? चर्चांना उधाण

2026-05-23 11:56:09

Rohit Pawar : 'ते' वक्तव्य अन् आता बारामतीत जनता दरबार; रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? चर्चांना उधाण

Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक

2026-05-21 18:09:18

Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक

Rohit Pawar : 'खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी'; रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

2026-05-20 10:08:26

Rohit Pawar : 'खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी'; रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ