Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा
Devendra Fadnavis : त्यांच्या या अचानक दौऱ्याचा नेमका अजेंडा अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी दिल्लीतील त्यांच्या भेटीगाठींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis : नागपूरच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा मारबत उत्सव काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. याशिवाय मराठी अभिनेता अंकुश चौधरी आणि बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या उत्सवाला आवर्जून उपस्थिती होती. मारबत उत्सव पाहण्यासाठी नागपुरात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, या उत्सवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक होणाऱ्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आज नागपूरहून थेट राजधानी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या या अचानक दौऱ्याचा नेमका अजेंडा अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी दिल्लीतील त्यांच्या भेटीगाठींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Devendra Fadnavis)
या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी काळातील महत्त्वाचे निर्णय तसेच राज्यातील विविध घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा अचानक दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दिल्लीतील बैठकांमध्ये नेमकी कोणती चर्चा होते, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Rakesh Bapat: राकेश बापटच्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री




