Pune: पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लि., पुणे यांच्या कोथरूड शाखेचा २५ वा (रौप्यमहोत्सवी) वर्धापन दिन समारंभ बुधवारी (दि. १५ एप्रिल २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भुसारी कॉलनी, पौड रोड येथील शिवसाई अपार्टमेंट येथे आयोजित या कार्यक्रमाला बँकेचे संस्थापक संचालक व विद्यमान अध्यक्ष कैलासराव (मामा) सखाराम कोद्रे यांच्यासह संचालक मंडळ सदस्यांची उपस्थिती लाभली. वर्धापन दिनानिमित्त कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ स्थानिक नागरिक, बँकेचे ग्राहक व सभासदांनी घेतला. तसेच महिलांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी, शिक्षिका, व्यावसायिक महिला तसेच महिला खातेदार यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून स्मिता सातपुते (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, शंकरराव मोरे विद्यालय) उपस्थित होत्या. त्यांनी बँकेस शुभेच्छा देत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक बंडू केमसे व स्थानिक मान्यवर चंद्रकांत शिंदे उपस्थित होते. बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षा स्मिता शैलेश लडकत यांनी महिलांना बँकिंग व्यवहारांबाबत मार्गदर्शन केले. समारंभास अध्यक्ष कैलासराव सखाराम कोद्रे (मामा), उपाध्यक्ष साहेबराव विठ्ठलराव लोणकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्षा स्मिता शैलेश लडकत, संचालक कैलास (भाऊ) रामचंद्र कोद्रे, मंगल शिवाजीराव टिळेकर, शांताराम कोंडिराम चौधरी, नंदकिशोर तुकाराम विडकर, देवेंद्र सुरेश भाट, अॅड. अविनाश केरवा कवडे, अॅड. दिलीप महादेव जगताप, संदीप (दादा) कैलासराव कोद्रे, अनिल जगन्नाथ आवनावे, ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, किशोर फत्तू संघेलिया, संतोष मधुकर पेठे, अमित अजित गिरमे, सल्लागार जीवन दत्तात्रय म्हेत्रे, तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य के. सी. मिश्रा, अविनाश साहेबराव बनमाले, बी. व्ही. मोहंती, सेवक प्रतिनिधी वाळू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जवळकर, महाव्यवस्थापक अस्लम तांबोळी, शाखा व्यवस्थापक तेजश्री पुरंदरे व सेवक वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी साहेबराव लोणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोहाराने समारंभाची सांगता करण्यात आली.