Praful Hinge Record : कोण आहे प्रफुल्ल हिंगे? विदर्भाच्या पोट्ट्याने पदार्पणाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये राजस्थानच्या ३ विकेट्स घेत रचला इतिहास
Praful Hinge Record : सनरायझर्स हैदराबादने (SRH) मैदानात उतरवलेल्या प्रफुल्ल हिंगे या युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच षटकात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

Who is Praful Hinge IPL Debut Record : आयपीएल २०२६ च्या २१ व्या सामन्यात एका नव्या तार्याचा उदय झाला आहे. सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगे या २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात आजवर कोणालाही जमला नव्हता.
सनरायझर्स हैदराबादने (SRH) मैदानात उतरवलेल्या प्रफुल्ल हिंगे या युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच षटकात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. प्रफुल्लने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला बाद केले. त्यानंतर त्याने ध्रुव जुरेलला बाद करून राजस्थानला दुसरा धक्का दिला. इतक्यावरच न थांबता, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ड्वेन प्रिटोरियसला बाद करत त्याने पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.
Vaibhav Sooryavanshi ✅
Dhruv Jurel ✅
Lhuan-dre Pretorius ✅A dream start for Praful Hinge on his #TATAIPL debut 🧡
Updates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/wLOPGPCqgR
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
कोण आहे प्रफुल्ल हिंगे?
मूळचा नागपूरचा असलेला २४ वर्षीय प्रफुल्ल देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळतो. घरगुती क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सनरायझर्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सने त्याला ट्रायलसाठी बोलावले होते. मात्र, डॅनियल व्हिटोरीच्या मार्गदर्शनाखालील सनरायझर्सने त्याच्यातील टॅलेंट ओळखून त्याला संघात स्थान दिले. प्रफुल्ल हा जयदेव उनाडकटप्रमाणे मध्यम वेगवान गोलंदाज असून चेंडूमध्ये विविधता आणण्यात तो निष्णात आहे.
W 0 W x 2️⃣! 🔥🔥
That’s how Praful Hinge started his #TATAIPL journey 🫡
WATCH HIS SPELL ▶️ https://t.co/TfdxX8zcQ2#KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/OBg64uuyTI
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
हेझलवूड आणि रिचर्डसनकडून घेतले धडे –
प्रफुल्ल २०२२ पासून चेन्नईतील ‘एमआरएफ पेस फाउंडेशन’शी जोडलेला आहे. २०२४ मध्ये त्याने ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे १५ दिवसांच्या डे-कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. तिथे त्याला जॉश हेझलवूड आणि झाय रिचर्डसन यांसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांसोबत सराव करण्याची संधी मिळाली. या अनुभवाचा त्याला विदर्भाकडून खेळताना आणि आता आयपीएलमध्ये पदार्पण करताना मोठा फायदा झाला.
प्रफुल्लची आतापर्यंतची कारकीर्द –
प्रफुल्लने आतापर्यंत १० प्रथम श्रेणी सामन्यात २७ बळी घेतले आहेत. विदर्भाने पहिल्यांदा विजय हजारे चषक जिंकला, तेव्हाही तो त्या संघाचा महत्त्वाचा भाग होता. ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षणाने त्याच्या गोलंदाजीत अधिक धार आणली असून, आता त्याने आयपीएलच्या मंचावर आपली मोहोर उमटवली आहे.





