Prabhsimran Singh Record : दिल्लीच्या मैदानात प्रभसिमरनचा तांडव! एकाच ओव्हरमध्ये ठोकले सलग ६ चौकार, पाहा VIDEO
Prabhsimran Singh Record : दिल्ली कॅपिटल्सच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना प्रभसिमरनने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली.

Prabhsimran Singh 6 fours in one over record : आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात दिल्लीने २६५ धावांचे दिले होते, जे पंजाबने १८.५ षटकांत पूर्ण करुन विजय मिळवला. या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत असले, तरी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर प्रभसिमरन सिंगने जे वादळ आणले, त्याने क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना प्रभसिमरनने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली.
एका षटकात ठोकले सलग ६ चौकार –
पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी हार न मानता प्रतिहल्ला चढवला. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या एकाच षटकात सलग ६ चौकार मारून २४ धावा वसूल केल्या. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी अजिंक्य रहाणे (२०१२) आणि पृथ्वी शॉ (२०२१) यांनी एका षटकात ६ चौकार मारले होते.
प्रभसिमरन की धमाकेदार बल्लेबाज़ी
Prabhsimran Singh ने Delhi Capitals के खिलाफ शानदार प्रदर्शन करते हुए 6 गेंदों पर 6 चौके जड़ दिए।
उनकी यह आक्रामक बल्लेबाज़ी पारी की शुरुआत में ही मैच का रुख बदलने वाली साबित हुई।
pic.twitter.com/9z51Fdx9bY— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) April 25, 2026
पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस –
6️⃣𝐭𝐡 𝐎𝐯𝐞𝐫. 6️⃣ 𝐁𝐚𝐥𝐥𝐬. 6️⃣ 𝐅𝐨𝐮𝐫𝐬. 🤯
Prabhsimran Singh becomes the 3rd batter to smash 6 fours in an over in TATA IPL. 💪#TATAIPL 2026 | #DCvPBKS | LIVE NOW 👉https://t.co/iY4R1ZY1Yn pic.twitter.com/sVXFJN1W90
— Star Sports (@StarSportsIndia) April 25, 2026
प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव टाकला. या जोडीने पावरप्लेच्या अवघ्या ६ षटकांत ११६ धावा कुटल्या. यादरम्यान पंजाबचा धावगतीचा वेग (Run Rate) १९ च्या वर होता. प्रभसिमरनचे वादळ इथेच थांबले नाही; मुकेशच्या षटकात ६ चौकार मारल्यानंतर पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवरही त्याने चौकार मारला. अशा प्रकारे सलग ७ चेंडूंवर ७ चौकार मारण्याचा अनोखा पराक्रम त्याने केला.
🚨 PRABHSIMRAN SINGH GOES BERSERK! 🚨
Prabhsimran Singh smashed 4,4,4,4,4,4 — six consecutive fours in a stunning display of aggression! 💥
Punjab Kings race to 116/0 at the end of the powerplay
A jaw-dropping start—this chase is on fire! 🔥🥶 pic.twitter.com/GXetJJmSZT
— Faruk🐦 (@uf2151593) April 25, 2026
पंजाबसाठी चौथे वेगवान अर्धशतक –
प्रभसिमरनने अवघ्या १८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंजाब किंग्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत त्याने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यादीत केएल राहुल (१४ चेंडू) अजूनही अव्वल स्थानी आहे.
पंजाबसाठी सर्वात वेगवान अर्धशतके:
- केएल राहुल – १४ चेंडू
- प्रियांश आर्या – १६ चेंडू
- निकोलस पूरन – १७ चेंडू
- प्रभसिमरन सिंग – १८ चेंडू





