Lungi Ngidi Injury : आयपीएलमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना! झेल घेताना दिल्लीच्या खेळाडूला गंभीर दुखापत, पाहा VIDEO
Lungi Ngidi Injury : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्सच्या डावातील तिसऱ्या षटकात ही धक्कादायक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Lungi Ngidi Head Injury Video Viral : आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात एका खेळाडूचा भीषण अपघात घडला. ज्यामुळे काही वेळासाठी सर्वांच्याच काळजाचे ठोके वाढले होते. कारण झेल घेण्याच्या प्रयत्नात दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याला गंभीर दुखापत झाल्याने मैदानावर एकच खळबळ उडाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्सच्या डावातील तिसऱ्या षटकात ही धक्कादायक घटना घडली. प्रियांश आर्यने मारलेला फटका हवेत असताना मिड-ऑफला उभा असलेला लुंगी एनगिडी झेल घेण्यासाठी मागे धावला. चेंडूचा अंदाज चुकल्याने एनगिडी धावताना जोरात जमिनीवर कोसळला. दुर्दैवाने पडताना त्याच्या डोक्याचा मागचा भाग जमिनीवर जोरात आदळला.
Lungi Ngidi has suffered a serious injury, and for the first time in IPL history, an ambulance has come onto the ground. This looks very serious—possibly a neck fracture, but hopefully it’s nothing that severe. 😱
It is also quite shameful for the Arun Jaitley Stadium DJ to play… pic.twitter.com/CrFFc3grvB
— Sonu (@Cricket_live247) April 25, 2026
मैदानावर १० मिनिटे पसरली शांतता –
SAD MOMENT IN DELHI 😢
Lungi Ngidi got injured during the clash between Delhi Capitals and Punjab Kings.
He has been taken to the hospital by ambulance. The injury looks serious.
Praying it’s nothing major and wishing him a speedy recovery. 💔🙏 pic.twitter.com/5DuYHgWiEA
— Jara (@JARA_Memer) April 25, 2026
डोक्याला गंभीर फटका बसल्याने एनगिडी काही वेळ जागेवरच निपचित पडला होता. जवळपास एक मिनिट त्याच्या हालचाली पूर्णपणे बंद होत्या, ज्यामुळे स्टेडियममधील प्रेक्षक आणि खेळाडूंच्या काळजाचा ठोका चुकला. तातडीने वैद्यकीय पथक मैदानात धावले. एनगिडीच्या मानेला ‘नेक ब्रेस’ लावून त्याला सुरक्षित करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मैदानावर रुग्णवाहिका (Ambulance) बोलवावी लागली. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही मैदानात धाव घेत एनगिडीच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्बल १० मिनिटांनंतर एनगिडीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
दिल्लीला मिळाला कन्कशन सब्स्टीट्यूट –
Lungi Ngidi leaves the field in an ambulance after a head injury while attempting a catch off Axar Patel’s bowling. 🤕
👉 Vipraj Nigam comes in as a substitute. pic.twitter.com/TKI7aaiYku
— The Free Hit (@THEFREEHITHQ) April 25, 2026
आयपीएलच्या नियमानुसार, डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’ची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यानंतर एनगिडीच्या जागी युवा लेग-स्पिनर विप्रज निगम याला संघात स्थान देण्यात आले आहे. विप्रज आता या सामन्यात एनगिडीची उरलेली षटके टाकू शकणार आहे. एनगिडीची प्रकृती आता स्थिर असली तरी, क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.





