प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांचा संकल्प
पिंपरी (प्रतिनिधी)– स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवता येऊ शकते, हा आत्मविश्वास येताच शेकडो विद्यार्थ्यांनी बाप्पा मोरयाचा गजर करत आता यापुढे “आम्हीच बनविणार आमचे बाप्पा’ असा संकल्प केला. हे उत्साहपूर्ण दृश्य पहायला मिळाले दैनिक प्रभातच्या “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या उपक्रमातंर्गत भोसरी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये आयोजित कार्यशाळेत. भोसरी, इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यशाळेत सहभाग नोंदवून उत्साही वातावरण आकर्षक आणि सुंदर गणेश मूर्तींना आकार दिला. आपल्या हाताने बनवलेली मूर्ती पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चित्र यावेळी पहायला
मिळाले.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/513154739457973/
दैनिक “प्रभात’च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या व”माणिकचंद'”प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या उपक्रमाच्या पाचव्या दिवशी भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील प्रियदर्शनी स्कूलमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत इय्यता आठवी, नववी व दहावीच्या 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने शाडू मातीपासून गणेशाची मूर्ती कशी साकारायची, याचे प्रशिक्षण नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी दिले. ठाकरे व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आणि त्यांनी देखील शाडूच्या मातीमधून श्रीगणेशाच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती साकारल्या.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी सिद्धीविनायक ग्रुप, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पुणे महापालिका यांचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रियदर्शनी शाळेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रमन सिंग यांचा दैनिक प्रभातचे जाहिरात विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी, प्रशासकीय व्यवस्थापक प्रवीण थूल, पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे व्यवस्थापक शिरीष समुद्र यांचे हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, राजेंद्र सिंग, नरेंद्र सिंग, तरुणा सिंग, मुख्याध्यापिका अर्पिता दीक्षित, डॉ. गायत्री जाधव, सतीश क्षीरसागर, प्रिया भोकरे, ललिता ठाकूर, शिवाजी आढळगे, स्वप्नजा माळी, उमेश कोळेकर, चैताली नाफडे, प्रतिमा परदेशी, प्रतिभा सिंग आदींची उपस्थिती होती.
अनुभव आनंददायी
गणपती बाप्पांची मूर्ती आम्हाला बनवता येईल की नाही, अशी शंका सुरुवातीला मनात होती. मात्र दैनिक “प्रभात’च्या या उपक्रमामुळे आम्ही, पहिल्यांदाच मूर्ती तयार केली. सोप्या पद्धतीत इतकी आकर्षक मूर्ती तयार करता येईल, असे वाटले नव्हते. आता याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आम्ही करणार असल्याचे असे मनोगत विद्यार्थ्यांनी दै. प्रभात बोलताना व्यक्त केले.
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागृती व्हावी, त्यासाठी विद्यार्थ्यांकडूनच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करुन घेण्याचा दैनिक “प्रभात’चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अलिकडच्या काळात सर्वत्र प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पर्यावरणाचे सवंर्धन करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी आणि प्रेरणादायी ठरणार आहे. मूर्ती साकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे आता असे उपक्रम राबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी दैनिक “प्रभात’ने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
– इंद्रमन सिंग, संस्थापक चेअरमन, प्रियदर्शनी स्कूल