प्रभासच्या ‘Salaar’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास; तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

Salaar Box Office Report : प्रभासच्या सालारने रिलीज झाल्यापासून सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी त्याने आपली जादू दाखवली आहे. आगाऊ बुकिंगमध्ये शाहरुखच्या ‘डंकी’ला मागे टाकणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाल केली.
270 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या प्रशांत नीलच्या या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येच जवळपास 50 कोटींचा व्यवसाय केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सालार’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी एकट्या भारतात 95 कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय केला आहे.
जर आपण एकूण कलेक्शनबद्दल बोललो तर प्रभासने या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर सालारने पहिल्याच दिवशी 175 कोटी रुपयांचा मजबूत आकडा गाठला आहे.
यासोबतच हा चित्रपट प्रभासच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. या चित्रपटात श्रुती प्रभाससोबत स्क्रीन शेअर करत आहे. तर, पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
प्रभास आणि श्रुती व्यतिरिक्त, सालारमध्ये टिनू आनंद, जगपीत बाबू, बॉबी सिम्हा, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, माइम गोपी आणि जॉन विजय यांसारखे कलाकार आहेत. या चित्रपटासाठी प्रभासने 100 कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर, श्रुती हसनने 8 कोटी रुपये घेतले आहेत.
‘सालार’ने मोडला बिग बजेट सिनेमांचा रेकॉर्ड!
‘सालार’ या सिनेमाने ओपनिंग डेला 95 कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग डेलाच या सिनेमाने ‘पठाण’ (Pathaan), ‘जवान’सह (Jawan) ‘डंकी’चाही (Dunki) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा वर्षातला मोठा ओपनर ठरला आहे.





