Mardini Marathi Movie Teaser : ‘मर्दिनी’चा दमदार टीझर रिलीज; प्रार्थना बेहेरेच्या रौद्र रूपाने प्रेक्षक थक्क
Mardini Marathi Movie Teaser : या टीझरमध्ये आपल्या लेकरावर संकट आल्यानंतर एक सामान्य आई रौद्र रूप कसं धारण करते, याची अस्वस्थ करणारी झलक पाहायला मिळते.

Mardini Marathi Movie Teaser : गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या मर्दिनी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यानंतर आता या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मर्दिनीचा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज करण्यात आला असून, प्रार्थना बेहेरेच्या पात्राची झलक दाखवण्यात आली आहे. जी चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण करते. अभिनेत्री एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Mardini Marathi Movie Teaser)
या टीझरमध्ये आपल्या लेकरावर संकट आल्यानंतर एक सामान्य आई रौद्र रूप कसं धारण करते, याची अस्वस्थ करणारी झलक पाहायला मिळते.
प्रार्थनाने मर्दिनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट लिहित घोषणा केली होती. आता मर्दिनीची झलक पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. तिच्या कॅाफी आणि बरंच काही चित्रपटाने मोठी लोकप्रसिद्धी तिला मिळवून दिली. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Mardini Marathi Movie Teaser)
या टीझरमध्ये अभिजीत खांडकेकर आणि जितेंद्र जोशी या पात्रांची छोटीशी झलक दाखविण्यात आली आहे. हे दोघेही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.
छोट्या पडद्यावरील लाडकी बालकलाकार मायरा वैकुळ ही देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. अजय मयेकर यांचा ‘मर्दिनी’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी भावना, थरार आणि नारीशक्तीचा प्रभावी संगम साधला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर टीझरची चर्चा असून, प्रार्थनाच्या मेकओव्हरचे भरभरून कौतुक केले जात आहे. (Mardini Marathi Movie Teaser)
नारीशक्तीच्या अथांग सामर्थ्याला सलाम करणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट येत्या ३ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रार्थनाचे चाहते उत्सुक झाले आहेत.
हेही वाचा : SIR Verdict: “SIR ला घटनाबाह्य घोषित करता येणार नाही” ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय





