मंचर (संतोष वळसे पाटील,प्रतिनिधी) :- मेंगडेवाडी ता .आंबेगाव येथील युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या बटाटाच्या झाडाला चक्क 18 ते 19 बटाटे लगडले आहेत. बटाट्याच्या झाडाला जमिनीत बटाटे येतात .परंतु येथे मात्र जमिनीवरील झाडाला बटाटे आल्याने कुतुहलाचा विषय झाला आहे .
बटाटा हे कंदमुळं आहे, अशीच त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हे बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात तेव्हा. आश्चर्य वाटलं ना.. पण खर आहे .हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. मेंगडेवाडी येथील माळरानावर संदीप आणि धनेश वळसे पाटील यांची शेती आहे. साडेतीन एकरावर त्यांनी पुखराज जातीच्या बटाटा वाणाची खरेदी मंचर बाजार समिती आवारातील मोरे ब्रदर्स संजय मोरे याच्याकडून घेऊन बटाटा लागवड 90 दिवसापूर्वी केली आहे.
सध्यस्थितीत बटाटा पीक काढणीला आलेले आहे. सरासरी 50 किलो बटाटा वाणाची लागवड केल्यानंतर सुमारे 15 बटाटा गोणी म्हणजे 900 किलो बटाट्याचे उत्पादन झाले. सरासरी 200 रुपये 10 किलो बाजारभावाने बांधावर येऊन व्यापारी बटाटा खरेदी करत आहे. अंतिम टप्प्यात बटाटा पिकाचे पाला काढण्याचे काम सुरू आहे. या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या बटाटा पिकातील एका झाडाला चक्क बटाटे लगडलेले दिसून आले.
बटाट्याची शेती म्हटलं की, जमिनीच्या वर हिरवागार पाला व जमिनीच्या आत बटाटे आपल्याला दिसतात. मात्र मेंगडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी संदीप आणि धनेश वळसे पाटील यांच्या बटाटा पिकातील एका झाडास जमिनीत बटाटे न येता फांदीला बटाटे आल्याची आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे.
हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत असताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटा चक्क जमिनीच्या वर आल्याने त्यांना आश्चर्य वाटले. तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत. जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
थंडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो. त्याचा प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे. वर बटाटा आल्याने परिसरात हा कुतूहालाचा विषय होत असून परिसरात शेतकरी हा जमिनीवर आलेला बटाटा बघण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. एका झाडाला 18 ते 19 उत्पादन झालेले बटाटे जोमात आले आहे. टोमॅटोच्या झाडाला ज्या पद्धतीने टोमॅटो लगडतात त्याच पद्धतीने बटाट्याच्या एका झाडाला जमिनीवर आलेल्या बटाटा बघण्यासाठी परिसरातील शेतकरी, नागरिक गर्दी करू लागले आहेत.