“लसूण 400 रुपये किलो, टोमॅटो आणि…” ; राहुल गांधींकडून भाज्यांचे भाव सांगत सरकारवर टीका ; व्हिडिओ केला शेअर

Rahul Gandhi In Market । लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी भाज्यांचे भाव जाणून घेण्यासाठी स्वतः भाजी मंडईत पोहोचले. याठिकाणी त्यांनी दुकानदाराकडे लसूण, टोमॅटो, सलगम यासह अनेक भाज्यांचे दर जाणून घेतले. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाजी मंडई भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राहुल गांधींनी पोस्ट शेअर करताना, “लसुणाची किंमत पूर्वी ४० रुपये होती आणि आता ४०० रुपये झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले असून सरकार कुंभकरणासारखे झोपले आहे.” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिल्लीच्या गिरी नगरसमोरील हनुमान मंदिराच्या भाजी मंडईचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये महिला राहुल गांधींना चहासाठी बोलवल्याचे सांगताना दिसत आहेत. जेणेकरून, ते येऊन पाहतात की किती महागाई आहे, त्यामुळे आमचे बजेट खूप खराब होत आहे. कोणाचाही पगार वाढला नसून दर वाढले आहेत . दर कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे राहुल गांधींना भेटणाऱ्या महिला सांगत आहेत. त्यात आणखी वाढ होईल.” असेही सांगतांना दिसत आहेत.
40-50 च्या खाली काहीही मिळत नाही Rahul Gandhi In Market ।
व्हिडिओमध्ये राहुल गांधी महिलांना विचारतात की, आज काय खरेदी करत आहेत? यावर एक महिला म्हणाली, ती काही टोमॅटो आणि कांदा खरेदी करत आहे. जेणेकरून किमान काहीतरी काम होईल. एका महिलेने भाजी विक्रेत्याला विचारले की यावेळी भाजी एवढी महाग का? अजिबात काही होत नाही. 30-35 रुपयांत काहीच मिळत नाही. सर्व काही 40-50 पेक्षा जास्त आहे.” असे त्या म्हणताना दिसत आहेत.
“लहसुन कभी ₹40 था, आज ₹400!”
बढ़ती महंगाई ने बिगाड़ा आम आदमी की रसोई का बजट – कुंभकरण की नींद सो रही सरकार! pic.twitter.com/U9RX7HEc8A
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2024
भाजी विक्रेत्यानेही महागाईचा मुद्दा मान्य केला. Rahul Gandhi In Market ।
राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भाजी विक्रेते यावेळी खूप महागाई असल्याचे सांगत आहेत. एवढी महागाई यापूर्वी कधीच नव्हती. राहुल गांधी भाजी विक्रेत्याला विचारतात लसूण किती आहे? यावर भाजी विक्रेते सांगतात की, लसुणाचा भाव 400 रुपये किलो आहे.
500 रुपये किमतीचा भाजीपाला आता 1000 रुपयांना
राहुल गांधी यांनी एका महिलेला विचारले की, “तुम्हाला महागाई का वाढत आहे, असे वाटते. यावर या महिलेचे म्हणणे आहे की, सरकार याकडे लक्ष देत नाही, त्यांना फक्त त्यांच्या भाषणाची काळजी आहे. सामान्य माणूस काय खाणार याची सरकारला काळजी नाही. ज्या वस्तूची किंमत पूर्वी 500 रुपये होती ती आज 1000 रुपये आहे. आता खर्च कमी करायचा असेल तर कपात करावी लागेल. यामुळे आम्हाला फक्त त्रास होईल.” असे ती महिला म्हणताना दिसत आहे.





