लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक एकमत : चीन
Updated On:

बिजिंग : दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक एकमत होत असल्याचे चीनने बुधवारी म्हटले आहे. सीमेवरून दोनही देशांनी आपल्या फौजा काही प्रमाणात मागे घेण्याचा प्रस्ताव भारताने काल दिला होता. त्या पार्श्वभूमीवर चीनच्या या वक्तव्याला महत्व आले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी दोन्ही बाजून पावले उचलण्यात येत आहेत.
भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लषकरती पातळीवरील संवाद अलीकडेच वाढला आहे. त्यांच्यात परिणामकारक संवाद होत आहे. सीमेवरलि तणाव संपुष्टात यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे, असे त्यांनी सांगितले.





