‘लाफ्टर शेफ’मध्ये बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता लावणार हजेरी; ‘सिकंदर’ करणार धमाल?

Laughter Chef 2 | टेलिव्हिजनवरील ‘लाफ्टर शेफ’ या रिएलिटी शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा शोचा दुसरा सीझन असून पहिला सीझन सुपरहिट झाला होता. टीआरपीमध्ये देखील या शोने आघाडी घेतली आहे. यातच आतामेकर्सने टीआरपीत झेप घेण्यासाठी बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानला या शोमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या शोमध्ये सलमान पाहुणा म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे.
सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये रुबिना दिलैक, अंकिता-विकी, मन्नारा चोप्रा, राहुल वैद्य, कृष्णा अभिषेक-कश्मिरा शाह, एल्विश यादव यासह काही सेलिब्रिटी दिसत आहेत. सध्या अब्दु रोझिकने रमजानसाठी ब्रेक घेतला आहे. अब्दुच्या जागी शोमध्ये करण कुंद्रा येणार आहे.
View this post on Instagram
करण शोच्या पहिल्या सीझनमध्ये होता. करणच्या कमबॅकमुळे सर्वांनाच आनंद होणार आहे. निर्मात्यांनी शोमध्ये करणच्या एन्ट्रीचा प्रोमो देखील शेअर केला आहे. ज्यात भारतीसह सर्व कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळते. Laughter Chef 2 |
इंडिया फोरम रिपोर्टनुसार, ‘लाफ्टर शेफ सीझन २’ मध्ये येत्या एपिसोडमध्ये सलमान खान त्याच्या आगामी ‘सिकंदर’ सिनेमाचं प्रमोशन करणार आहे. ईदच्या मुहुर्तावर २८ मार्च रोजी ‘सिकंदर’ रिलीज होणार आहे. या सिनेमात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना दिसणार असून ए.आर.मुरुगदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. Laughter Chef 2 |
हेही वाचा:
शिक्षक धनंजय नागरगोजे मृत्यूप्रकरणी विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल





