‘धुरंधर’ सिनेमात परवीन बाबीच्या भूमिकेत दिसणार लोकप्रिय अभिनेत्री

Dhurandhar Film | ‘अॅनिमल‘ चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या दिग्गज अभिनेत्री परवीन बाबी यांचे पात्र एका सिनेमामध्ये साकारणार आहे. परवीन बाबी या हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्री होत्या, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. अशा दिग्गज व्यक्तिरेखेची भूमिका पडद्यावर साकारणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट आहे. जी संधी आता तृप्तीला मिळाली आहे.
पिंकव्हिला रिपोर्टनुसार, रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर‘ सिनेमात तृप्ती डिमरी परवीन बाबीच्या भूमिकेत दिसणार आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाचे मेकर्स हे बिग सरप्राईज चाहत्यांना देणार आहेत. सिनेमाचं पहिलं गाणं यावेळी रिलीज होणार आहे. या गाण्यात तृप्ती परवीन बाबी साकारणार आहे. याचा अर्थ सिनेमात तृप्ती डिमरीचा कॅमिओ असणार आहे. हा स्पाय थ्रिलर चित्रपट 70-80 च्या दशकातील कथानकावर आधारित असून यात परवीन बाबी यांचा उल्लेख चित्रपटात येणार आहे. Dhurandhar Film |
View this post on Instagram
परवीन बाबी त्या काळात त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अभिनेत्री होत्या. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही परवीन बाबी यांचा चाहतवर्ग मोठ्या प्रमाणात होता. याच आधारावर ‘धुरंधर’मध्ये त्यांच्या पात्राचा समावेश करण्यात आला आहे. आता तृप्ती डिमरी परवीन बाबी यांच्या या भूमिकेला कशा प्रकारे साकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘धुरंधर’ कधी प्रदर्शित होणार?
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या धुरंधर चित्रपटाने आपल्या दमदार टीझरने प्रेक्षकांची मनं आधीच जिंकली आहेत. प्रेक्षक रणवीर सिंगच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहाट प्रदर्शित होणार आहे. Dhurandhar Film |
हेही वाचा:





